एक्स्प्लोर
नवी मुंबईत व्यापाऱ्याची हत्या, पत्नी-मुलगी पोलिसांच्या ताब्यात

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या कामोठ्यात एका व्यापाऱ्याची चाकूनं वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. कौटुंबिक कलहातून व्यापाऱ्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विनोद शाह असं हत्या झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे. विनोद यांची पत्नी आणि मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. बुधवारी सकाळी कामोठे गावाजवळ शाह यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. मंगळवारी रात्री उशिरा ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रात्री उशिरा धारदार शास्त्राने या व्यापार्यांच्या छातीवर वार करून हत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे.
Before You Go
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















