एक्स्प्लोर

भाजपच्या गणेश नाईकांना धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

नवी मुंबईत भाजप आमदार गणेश नाईकांना जोरदार धक्का बसला आहे. भाजपच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दुपारी हा प्रवेश पार पडला. सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्के आणि मुद्रिता गवळी अशी या नगरसेवकांची नावं आहेत.

मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीआधी भाजप आमदार गणेश नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबई महापालिकेतील भाजपच्या 4 नगरसेवकांनी राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश या चारही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तुर्भे येथील ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्के, मुद्रिका गवळी अशी या चार नगरसेवकांची नावं आहे.

यावेळी नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले देखील उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेवर आगामी महापौर शिवसेनेचाच होणार आहे. महाविकास आघाडीची ताकद वाढत आहे. गणेश नाईकांची काय अवस्था झाली आहे, यापेक्षा आमची ताकद वाढत आहे हे महत्वाचं असल्याचं विजय चौगुले यांनी म्हटलं.

कार्यकर्त्यांची भावना होती की महाविकास आघाडीमध्ये सामील व्हावं. म्हणून शिवसेनेत प्रवेश केला आहे. गणेश नाईकांबद्दल काही बोलायचं नाही. आम्ही चार नगरसेवकांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे, इतर नरसेवकांबाबत काही माहिती नाही, असं सुरेश कुलकर्णी यांनी म्हटलं.

सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, मुद्रिका गवळी व संगिता वास्के यांनी काही दिवसांपूर्वीच आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे आपले राजीनामा सुपूर्द केले होते. तुर्भे येथील एका कार्यक्रमात या नगरसेवकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित केलं होतं. त्यामुळे निवडणूक जवळ आल्यावर हे चारही नगरसेवक भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. चारही नगरसेवक गणेश नाईक यांच्यासोबत भाजपात आले होते.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होणार आहे. गेली अनेक वर्ष महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या गणेश नाईक यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आतापासूनच महाविकास आघाडीमार्फत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget