एक्स्प्लोर

NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 'राष्ट्रीय दर्जा' धोक्यात? निवडणूक आयोगाकडून फेरविचार सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवावा का याबाबत सध्या निवडणूक आयोगाकडून चाचपणी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा निवडणूक आयोगाकडून फेरविचार करत असल्याची बाब समोर आली आहे. मंगळवारी आयोगासमोर पक्षाच्या वतीने बाजू देखील मांडण्यात आली.  प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे वकील सुनावणीला हजर असल्याची   माहिती सूत्रांनी दिली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवावा का याबाबत सध्या निवडणूक आयोगाकडून चाचपणी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच आयोगाच्या कार्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देखील आपलं म्हणण मांडण्यासाठी बोलावण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार स्वतः राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे आयोगाच्या कार्यालयातून जाऊन आले आहेत. एबीपी माझाला मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक आयोगाने सध्या राष्ट्रीय दर्जा कायम ठेवण्यासाठी फेरआढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती करण्यात आल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबतच निवडणूक आयोगाच्यावतीने याआधी मायावती यांचा बसप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनाही 2019 साली निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्या वर्षीचा लोकसभा निवडणुकीतील संबंधित पक्षाची कामगिरी पाहता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेऊ नये असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.  या संपूर्ण प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणार असल्याच्या बातम्या धुडकावून लावल्या आहेत. तसेच प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात गेलेल्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची आणि निवडणुक आयोगातील अधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा झाली असून पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा अबाधित राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य महाराष्ट्रासह नागालँड, केरळ आणि झारखंड या राज्यात  आहेत. तसेच निवडणूक आयोगाने घातलेल्या अटी शर्थी पूर्ण करत असल्यामुळे आम्हांला अडचण नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे.  मात्र आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतोय याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Jayant Patil : ...तोपर्यंत शिंदे गट टिकणार नाही, विधानसभा निवडणुकीबाबत नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Amit Thackeray: 'तामिळनाडूकडून धडा घ्या, महाराष्ट्र आधी, राजकारण नंतर'; 'नीट' रद्दच्या ठरावावरून अमित ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
'तामिळनाडूकडून धडा घ्या, महाराष्ट्र आधी, राजकारण नंतर'; 'नीट' रद्दच्या ठरावावरून अमित ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Gadchiroli Snake Bite Case: आश्रमशाळेतीळ सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
गडचिरोलीच्या आश्रमशाळेतीळ सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Maharashtra Goverment On Student Protest: महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय
महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Embed widget