एक्स्प्लोर
आत्महत्या करण्यापूर्वी निकाल तर पाहायचा होतास...
नाशिक : दहावीच्या निकालाचं टेंशन घेऊन आत्महत्या केलेल्या नाशिकच्या कौस्तुभ मुंगेकरला दहावीत 69 टक्के गुण मिळाले आहेत. कौस्तुभने काल निकालाचं दडपण आल्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
सोशल मीडियावर दहावीच्या निकालाबाबत वेगवेगळ्या तारखा व्हायरल होत होत्या. काल निकाल जाहीर होण्याची तारीख सोशल मीडियावर पाहिली आणि कौस्तुभने निकालाचा धसका घेऊन आत्महत्या केली. मात्र कौस्तुभने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे.
मोठ्या प्रतीक्षेनंतर आज (13 जून) राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली. 91.46 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.51 आहे.
बारावीप्रमाणे दहावी परीक्षेतही कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागातील 96.18 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement