एक्स्प्लोर
तोफांशी खेळणाऱ्या जवानाचा तोफखान्यात गळफास
नाशिक: बडीज ड्युटीच्या नावाखाली लष्करी जवानांची अधिकाऱ्यांकडून होणारी पिळवणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नाशिकमधल्या आर्टीलरी सेंटरमध्ये रॉय मॅथ्यू या जवानानं आत्महत्या केली आहे.
२५ तारखेपासून बेपत्ता असलेल्या मॅथ्यूचा गळफास घेतलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बराकमध्ये मिळून आला. काही दिवसांपूर्वी एका वेबसाईटच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मॅथ्यूनं या पिळवणुकीबद्दल तक्रार केली होती. याच घटनेनंतर तणावात असलेल्या मॅथ्यूनं आत्महत्या केल्याचं उघड झाल्यानं या घटनेला वेगळं वळण मिळालं आहे.
डीएस रॉय मॅथ्यू हा भारतीय लष्कराच्या तोफखाना विभागात अर्थात आर्टिलरीत गनर या पोस्टवर होता. नाशिकमधल्या देवळालीत असलेल्या आर्टिलरीच्या एका बराकमध्ये गळफास घेतलेल्या कुजलेल्या अवस्थेत मॅथ्यूचा मृतदेह आढळून आला. २५ तारखेपासून मॅथ्यु बेपत्ता होता. त्याच्या घरच्यांना आणि कोलम जिल्हाधिकाऱ्यांना लष्करातर्फे 'अॅबसेंट विदाऊट ऑफिशियल लिव्ह'ची नोटीसही देण्यात आली होती.
अधिकाऱ्यांकडून पिळवणूक होत असल्याचा आरोप काही जवानांनी केला होता. या जवानांमध्ये मॅथ्यूचाही समावेश होता.
लष्कराच्या 13 वर्षांच्या सेवेत मी फक्त अधिकाऱ्यांची कुत्री, मुलं सांभाळली असं मॅथ्यू म्हणाला होता. हा व्हिडीओ न्यूज चॅनेलच्या वेबसाईटवर आल्यानंतर अधिकाऱ्यांकडून त्याला टॉर्चर केल्याने, तणावात असलेल्या मॅथ्यूनं आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.
गनर असलेला मॅथ्यू 13 वर्षापासून आर्टीलरीतल्या कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यांचा बडी म्हणून काम करत होता. हा व्हिडीओ वायरल झाल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मॅथ्यूला धारेवर धरल्याचं बोललं जातं. लष्कराची बदनामी केल्याचा ठपकाही त्याच्यावर ठेवण्यात आला. 24 फेब्रुवारीला व्हिडीओ आला आणि याच तणावात असलेल्या मॅथ्यूने 25 तारखेला घरच्यांशी शेवटचं बोलणं केलं आणि आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.
अर्थात मॅथ्यूच्या घरच्यांनी मात्र या प्रकरणी आपल्याला काहीही माहित नसून पोलीस आणि लष्कराच्या चौकशीत सत्य समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मॅथ्यूच्या मृतदेहाजवळ मल्ल्याळम भाषेत लिहिलेल्या डायरीत कदाचित यासंदर्भातलं सत्य लिहलेलं असू शकेल. ही डायरी पंचनाम्यासाठी जप्त करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी बीएसएफ जवान तेजबहादूर यादव याने सैनिकांच्या शोषणाला, दुरावस्थेला चव्हाट्यावर आणलं होतं. त्यात आता मॅथ्यूसारख्या उमद्या जवानाच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement