एक्स्प्लोर

Nashik : 15 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यत पिझ्झा अन् बरंच काही... नाशिकरोड रेल्वेस्टेशनवर रेल्वे बोगीतलं रेस्टॉरंट

Nashik News : नाशिकरोड रेल्वेस्थानकाबाहेर रेल्वेच्या बोगीत भन्नाट रेस्टॉरंट बनविण्यात आले असून रेल्वे डब्ब्यात बसून जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे.

नाशिक : नाशिक शहरात (Nashik) एकाहून एक सरस हॉटेलांची काही कमी नाही, मात्र एखादेच हटके हॉटेल ग्राहकांच्या लक्षात राहून जात. असंच एक भन्नाट रेस्टॉरंट उभारलंय, जिथं मस्त टेबल, खुर्च्या, सुंदर फुगे फुलांची सजावट, वातावरण एकदम कडक आणि थ्री स्टार हॉटेलचा फिल असणारं रेस्टॉरंट सुरू झालंय, पण हे कुठल ठिकाण नाही तर एक रेल्वेची बोगी (Train Coach) आहे. होय एका रेल्वेच्या बोगीत नाशिकरोड रेल्वेस्थानकाबाहेर (Nashikroad Railway) हे भन्नाट रेस्टॉरंट बनविण्यात आले आहे.

नाशिकमध्ये हॉटेल व्यवसायात दिवसेंदिवस वाढ होत असतांनाच या व्यवसायात नव नविन बदलही बघायला मिळत आहेत. रेल्वे बोर्डाने जून्या पडून राहिलेल्या बोगीचा वापर करत त्यातून नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासोबतच महसूल मिळवण्याचं ठरवलं आणि एका व्यावसायिकाने ते टेंडर मिळवत नाशिकरोड रेल्वेस्टेशन बाहेर चक्क रेल्वेच्या बोगीतच रेस्टॉरंट उभं केलंय. ऑफ ट्रॅक रेल्वे कोच रेस्टॉरंट (Off Track Railway Coach Restaurant) असे त्याला नाव देण्यात आले असून सध्या हे रेस्टॉरंट नाशिककरांसाठी एक आकर्षण ठरत आहे. बोगीच्या आतमध्ये गेल्यावर फाइव्ह स्टार हॉटेलचा अनुभव ग्राहकांना येणार आहे. चोवीस तास सुरू राहणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये व्हेजपासून नॉन व्हेजपर्यंत सर्वच पदार्थ चाखायला मिळणार आहे. त्यामुळे आतापासूनच रेल्वे प्रवाशांसह नाशिककरांची गर्दी होऊ लागली आहे. 

भुसावळ मंडळाच्या (Bhusawal) मध्य रेल्वे विभागाने खाण्याची मेजवानी अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून प्रवाशांना उपलब्ध व्हावी, म्हणून ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ ही संकल्पना पुढे आणली. उपयोगात नसलेली बोगी भुसावळ रेल्वे स्थानकातुन नाशिकरोड रेल्वेस्थानकापर्यंत एक जुनी बोगी आणण्यात आली. या बोगीवर आर्किटेकच्या मध्यमातून सुंदर असे डेकोरेशन करण्यात आले आहे. नाशिकची ओळख धार्मिक नगरी असल्याने बोगी बाहेर सुंदर असे काळाराम मंदिर, गांधी ज्योत आणि ईतर मंदिरांचे चित्र रेखाटण्यात आले आहे तर बोगीच्या आत बसून जेवण करतांना जणू डेक्कन क्वीन ट्रेनमध्ये बसूनच आपण जेवणाचा आनंद घेत असल्याचा भास होतो. अशाप्रकारे रेस्टॉरंटचे सुशोभीकरण केले गेले आहे. यासाठी जवळपास 45 लाख रुपये खर्च करण्यात आला असून रेस्टॉरंटची क्षमता 60 लोकांची आहे, वातानुकूलित असे हे रेस्टॉरंट 24 तास खुले राहणार आहे. व्हेज, नॉनव्हेज, साऊथ इंडियन असे जवळपास सर्व प्रकारचे फूड ईथे उपलब्ध असणार आहे. 

ऑफ ट्रॅक रेल्वे कोच रेस्टॉरंट

भुसावळ येथून जुनी बोगी आणून नाशिकरोड रेल्वेस्थानकाबाहेर उभी करण्यात आली. या बोगीला रेस्टॉरंटप्रमाणे लूक देण्यात आला आहे. यासाठी जवळपास ४५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. बाहेरूनच पाहताना एखाद्या रेल्वेच्या डब्यात चढत आहोत कि काय असा भास होतो. आतमध्ये आतमध्ये गेल्यावर फाइव्ह स्टार हॉटेलमध्येआल्यासारखे वाटते. जशी रेल्वेत बैठक व्यवस्था असते, अगदी त्याच पद्धतीने ग्राहकांना बसण्यासाठी टेबल आणि खुर्च्या बसविण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे झुंबर, लायटिंग आणि आतमधील सजावटीने हॉटेल इतक्या आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले की, प्रवाशांना बोगित बसल्याचा अनुभव नाही तर एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून जेवण करीत असल्याचा भास होत आहे. त्या सोबतच रेल्वेची थीम येणारी बैठक व्यवस्था सुद्धा आकर्षणाचा केंद्र आहे. विविध व्यंजनांनी येथील स्वयंपाकगृह सज्ज राहणार असून कर्मचारी सुद्धा रेल्वेच्या टीसीच्या  ड्रेस कोडमध्ये दिसणार आहेत.

15 रुपयापासून ते 200 रुपयांपर्यत पिझ्झा मिळणार 

दरम्यान हे संपूर्णतः वातानुकूलित असे हे रेस्टॉरंट असून 24 तास खुले राहणार आहे. व्हेज, नॉनव्हेज, साऊथ इंडियन असे जवळपास सर्व प्रकारचे फूड ईथे उपलब्ध असणार आहे. तसेच 15 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यत पिझ्झा मिळणार आहे. रेल्वे बोगीत साथ लोक तर बाहेर चाळीस लोक बसतील एवढी जागा आहे. महत्वाचे म्हणजे या रेल्वे बोगीच्या डेकोरेशनसाठी जवळपास 45 लाख रुपये खर्च आल्याचे रेस्टॉरंटमालकाने सांगितले तसेच एका दिवसाला 5 हजार रुपये भाडे असून रेल्वे प्रशासनाला द्यावे लागणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik Railway Mega block : नांदगावला दोन दिवस मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, नाशिकरोडमार्गे जाणाऱ्या आठ प्रवासी गाड्या रद्द 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaubeej 2024 Wishes : भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 11 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMahim Vidhansabha Election Special Report : माहीमचा किल्ला, मतभेदाचे तडे?ABP Majha Headlines :  10  PM :   2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 9 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaubeej 2024 Wishes : भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
Embed widget