एक्स्प्लोर

'इडा पीडा टाळू दे, बळीचं राज्य येऊ दे!' देशात बळीची दोनच मंदिरं, त्यातलं नाशिकमध्ये एकमेव बळी मंदिर

बळीराजाची भारतात दोन मंदिरे असून त्यातील महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एकमेव बळी मंदिर असून ते सर्वदूर परिचित आहे. आज बलिप्रतिपदेनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

Nashik News:  इडा पीडा टाळू दे, बळीचं राज्य येऊ दे! आज बलिप्रतिपदा (Bali Pratipada). बळीराजाला (Bali Raja) अभिवादन करण्याचा दिवस. बळीराजाची भारतात दोन मंदिरे असून त्यातील महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एकमेव बळी मंदिर असून ते सर्वदूर परिचित आहे. आज बलिप्रतिपदेनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

मंदिराचे शहर म्हणून नाशिक शहराची विशेष ओळख आहे. याच नाशिकमध्ये महाराष्ट्रातील एकमेव बळी मंदिर आहे. जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्याला बळीराजा म्हणून संबोधिले जाते. शेतकऱ्यांचा देव म्हणून पुजल्या जाणाऱ्या बळीचे एकमेव बळी मंदिर नाशिकच्या पंचवटी परिसरात उभारण्यात आले आहे. 

नाशिक शहराच्या पंचवटी परिसर व मुंबई आग्रा मार्गावर अलीकडेच नव्याने उभं राहिलेलं मंदिर बळीराजाच्या अस्तित्वाची साक्ष देतं. या मंदिरात पाडव्याच्या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यंदा बळी मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली असून, बळी महाराज अमर मित्रमंडळाच्या वतीने बलिप्रतिपदा व भाऊबीज उत्सव साजरा करण्यात येतो. नाशिकहून ओझरकडे जाणाऱ्या मार्गावर नाशिकची शिव म्हणजे बळी महाराज मंदिर ओळखले जाते. नवीन लग्न झालेली जोडपी शहरात जाताना किंवा येताना श्रीफळ वाढवल्याशिवाय जात नाही, अशी भाविकांची धारणा आहे.

दरम्यान मुंबई आग्रा महामार्गावर छोट्याशा ठिकाणी हे बळी मंदिर वसलेलं होते. मात्र त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित असल्याने हे मंदिर हटवून नव्या जागेवर उभारण्यात आले. यासाठी अनेक स्तरावरून यास विरोध करण्यात आला होता. मात्र शेवटी बाजूलाच असलेल्या जागेवर बळी मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर उभारण्यासाठी सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वाचाच हातभार लागला असून सुमारे दीड कोटी रुपये खर्चून हे मंदिर उभारण्यात आले आहे. 

अशी आहे अख्यायिका
एकदा महालक्ष्मी प्रत्यक्ष बळीराजाला भेटण्यास आल्यानंतर महालक्ष्मीने बळीराजाकडे काही घेण्याचा आग्रह केला. तेव्हा बळीराजाने महालक्ष्मीकडे असा वर मागितला की, जी मंडळी आपल्या घरी तीन दिवस दीपोत्सव साजरा करतील, त्यांच्या घरी महालक्ष्मी स्थिर होईल. अशा या बळीराजाचे भारतामध्ये दोनच मंदिरे आहेत. एक बळी मंदिर महाराष्ट्रात नाशिकमध्ये असून दुसरे कर्नाटक राज्यात असल्याचे समजते.

41 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह..
अनेक लोकांच्या उदार देणगीतून या ठिकाणी मंदिराची पुनर्उभारणी करण्यात आली. या ठिकाणी गेली 41 वर्षांपासून सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह या परिसरातील प्रगतिशील शेतकरी वाळूमामा शिंदे, सुनील सूर्यवंशी यांच्या माध्यमातून सुरू आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Embed widget