नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सरकारकडून समिती स्थापन, कोण-कोणत्या मंत्र्यांना मिळाली संधी?
2027 मध्ये नाशिक येथे महाकुंभमेळा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने मंत्र्यांची एक समिती स्थापन केलीय. 2027 ते 28 या काळात महाकुंभासाठी सरकारने सात राज्य मंत्र्यांची एक समिती स्थापन केली आहे.
Nashik Kumbh Mela : 2027 मध्ये नाशिकयेथे सिंहस्थ महाकुंभमेळा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने मंत्र्यांची एक समिती स्थापन केली आहे. 2027ते 28 या काळात महाकुंभासाठी महाराष्ट्र सरकारने सात राज्य मंत्र्यांची एक समिती स्थापन केली आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री आणि समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कुंभमेळा शिखर समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. सात मंत्र्यांची समिती कुंभमेळ्याच्या महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय, तयारी आणि आयोजनाचा आढावा घेणार आहेत. या समितीत वेगवेगळ्या विभागाचे सचिव आणि अधिकाऱ्यांना देखील असणार आहेत.
मंत्रिमंडळातील कोणत्या सदस्यांचा समितीत समावेश?
1) छगन भुजबळ
2) दादा भुसे
3) उदय सामंत
4) जयकुमार रावल
5) माणिकराव कोकाटे
6) शिवेंद्रसिंह भोसले
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाचे उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
नाशिक आणि परिसरातील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाचे उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करावे. त्याचबरोबर विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’च्या सुविधेत वाढ करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाची 92 वी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. अपर मुख्य सचिव (विमान चालन) संजय सेठी, मुख्यमंत्री यांच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, सिडको चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे आदी यावेळी उपस्थित होते.
शिर्डीमध्ये विमानांच्या पार्किंगचे दर इतर विमानतळाच्या तुलनेत कमी ठेवण्यात यावेत
शिर्डीमध्ये विमानांच्या पार्किंगचे दर इतर विमानतळाच्या तुलनेत कमी ठेवण्यात यावेत. शिर्डीचे महत्व आणि आगामी काळात येथे येणाऱ्या भाविकांची वाढणारी संख्या विचारात घेता विमानतळजवळ पंचतारांकित हॉटेलची सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे, यासाठी जागा सुनिश्चित करुन नामांकित हॉटेल्स कंपन्यांना येथे निमंत्रित करावे. यवतमाळ येथील विमानतळाची धावपट्टीची लांबी वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगून त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिली. जेथे खासगी कंपन्या विमानतळ चालवण्यास घेतात तथापि मध्येच ते बंद पडतात, अशा ठिकाणी दंड आकारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले
महत्वाच्या बातम्या:
























