एक्स्प्लोर
सव्वा वर्षांच्या चिमुकलीची चोराकडून हत्या, आईचा दावा, पोलिसांना संशय
घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्याने आपल्या मुलीची हत्या केल्याचा दावा नाशकातील महिलेने केला आहे. मात्र घरातील कुठलीही वस्तू चोरीला गेल्याचं प्रथमदर्शनी दिसत नसल्यामुळे या घटनेबाबत पोलिसांना संशय आहे.

नाशिक : नाशकात सव्वा वर्षांच्या चिमुरडीच्या हत्येने खळबळ उडाली आहे. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एकाने आपल्या मुलीची हत्या केल्याचा दावा पालकांनी केला आहे. मात्र पोलिसांना हत्येविषयी संशय आहे.
नाशिकमधील आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. स्वरा मुकेश पवार या चौदा महिन्यांच्या मुलीचा मृत्यूप्रकरणी रात्री उशिरा अज्ञाताविरोधातचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्वराच्या आईच्या सांगण्यावरुन वडील मुकेश पवार यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.
अज्ञात चोरटा चोरीच्या उद्देशाने चाकू घेऊन घरात शिरला होता. त्याने आपल्या मुलीच्या गळ्यावर घरात असलेल्या ब्लेडने वार केल्याचा दावा, पालकांनी तक्रारीत केला आहे.
या घटनेत स्वराची आईसुद्धा जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र घरातील कुठलीही वस्तू, सोनं किंवा पैसे चोरीला गेल्याचं प्रथमदर्शनी दिसत नाही. त्यामुळे या घटनेबाबत पोलिसांना संशय असून अधिक तपास सुरु आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
हिंगोली
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























