एक्स्प्लोर
तडफडणाऱ्या तरुणावर भररस्त्यात उपचार
तातडीच्या उपचारामुळे अपघातग्रस्त तरुणाचे प्राण वाचलेत.

नाशिक: सध्या अनेक डॉक्टरांनी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रिदवाक्य विसरल्याचं चित्र पाहायला मिळतं. मात्र नाशिकमधील एका डॉक्टरांनी या ब्रिदवाक्याला जागून, गरजू रुग्णावर तातडीने उपचार केले. या तातडीच्या उपचारामुळे अपघातग्रस्त तरुणाचे प्राण वाचलेत.
काय आहे प्रकरण?
नाशिकच्या पंचवटीतील अमृतधाम परिसरात मंगळवारी रात्री 10.30 सुमारास दोन दुचाकींचा समोरा समोर भीषण अपघात झाला. या अपघातात एक व्यक्ती गंभीर झाली, त्याच्या छातीला आणि डोक्याला जबर मार लागला.
रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात तो पडला असतानाच, बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी कळवणच्या शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर सुहास कोटक हे याच रस्त्याने जात होते. त्यांनी हा सर्व प्रकार बघताच गाडी थांबवली आणि रस्त्यावरच त्वरित जखमींवर उपचार सुरु केले.
अपघातात जखमींच्या तोंडातून रक्तस्त्राव होत असल्याने त्याला ऑक्सिजनची गरज होती. अॅम्बुलन्स येईपर्यंत अर्धा तास निघून गेला होता. मात्र डॉक्टर कोटक यांनी आपल्या गाडीत असलेला ऑक्सिजन पंप काढला आणि जखमींवर अपघातस्थळी उपचार सुरु केला.
या उपचारामुळे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे प्राण वाचले.
ही सर्व घटना कळताच पंचवटी पोलिस स्टेशनच्या पोलीस निरिक्षकांसह पोलीस पथक दाखल झालं आणि त्यांनी इतर ३ जखमींसह गंभीर जखमी युवकाला जवळील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
