पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशकात, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मोदींची 2014 मध्ये ज्या ठिकाणी सभा झाली तिथेच म्हणजे तपोवनातील साधूग्रामच्या जागेवर आजची सभा होणार आहे.
![पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशकात, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप Narendra Modi on nashik tour, Chief Ministers Mahajendesh Yatra end today पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशकात, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/15111938/narendra-Modi-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज नाशिकमध्ये समारोप होत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी नाशिकमध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची 2014 मध्ये ज्या ठिकाणी सभा झाली तिथेच म्हणजे तपोवनातील साधूग्रामच्या जागेवर आजची सभा होणार आहे. नाशिकच्या तपोवन परिसरातील 20 एकर जागेवर ही सभा होणार असून, या सभेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पावसाचे सावट असल्याने 20 वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आले आहेत. भव्य व्यसापीठासह दोन लाख लोकांच्या बसण्याची व्यवस्था आणि साधारण 30 स्क्रीन लावण्यात आले आहेत.
येत्या दोन दिवसांत राज्यात आचरसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदी विरोधकांविषयी काय बोलणार, राज्यातील जनतेसाठी काय घोषणा करणार हे पाहावं लागणार आहे.
नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा
- दुपारी 12.30 वाजता ओझर विमानतळावर आगमन
- दुपारी 12.40 वाजता तपोवन नाशिककडे निघणार
- दुपारी 1 वाजता मीनाताई ठाकरे मैदान हेलिपॅडवर आगमन
- दुपारी 1.05 वाजता सभास्थळाकडे रवाना
- दुपारी 1.10 वाजता सभेच्या ठिकाणी दाखल होणार
- दुपारी 1.15 वाजता सभेला सुरुवात
- दुपारी 2.50 वाजता सभेच्या ठिकाणाहून हेलिपॅडकडे रवाना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)