एक्स्प्लोर

मोठी बातमी : 'दाभोलकर हत्या आणि मी', जामीनावरील संशयित आरोपी विक्रम भावेंच्या पुस्तकात खळबळजनक दावे!

Narendra Dabholkar Case : 'दाभोलकर हत्या आणि मी', या पुस्तकात जामीनावरील संशयित आरोपी विक्रम भावे याने खळबळजनक दावे केले आहेत.

कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून जामिनावर बाहेर असलेले विक्रम भावे (Vikram Bhave) यांच्या ‘दाभोळकर हत्या आणि मी’ (Dabholkar Murder and Me) या पुस्तकाचं आज कोल्हापुरात (Kolhapur)प्रकाशन होत आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत येण्याची शक्यता आहे. सनातन संस्थेशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या विक्रम भावे यांना यापूर्वी या प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र, आपण आणि इतर काहीजण या प्रकरणात विनाकारण गोवले गेल्याचा दावा भावे यांनी या पुस्तकातून केला आहे.

विक्रम भावे यांच्या म्हणण्यानुसार, 'दाभोळकर हत्या आणि मी’ हे पुस्तक केवळ त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचं चित्रण नसून, हे एका निरपराध हिंदू व्यक्तीच्या सत्यनिष्ठेचा आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा दस्तावेज आहे. त्यामुळे हे पुस्तक वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे : 

तपासाची दिशा आधीच ठरवली गेली? 

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर, तत्कालीन मुख्यमंत्री यांनी जाहीरपणे हिंदुत्ववाद्यांवर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे तपासाची दिशा आधीच ठरवून टाकली गेल्याचा आरोप भावे यांनी केला आहे.

लोकशाहीला धक्का देणारा अनुभव :

हिंदुत्ववाद्यांना या प्रकरणात केवळ त्यांच्या विचारधारेसाठी लक्ष्य करण्यात आलं, असा भावे यांचा दावा आहे. हा अनुभव केवळ वैयक्तिक पातळीवरच नाही तर लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवरही प्रश्न उपस्थित करणारा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

"हिंदुत्ववादी असणं हा गुन्हा आहे का?"

केवळ हिंदुत्ववादी असल्यामुळे एवढे भयंकर परिणाम भोगावे लागले, यावर आश्चर्य व्यक्त करत भावे विचारतात की, "या देशात हिंदुत्ववादी असणं हा गुन्हा ठरत आहे का?"

वेब सिरीजसारखा अनुभव :

या प्रकरणातील अटक, चौकशी आणि तुरुंगातील अनुभव इतका नाट्यमय होता की, तो एखाद्या वेब सिरीज किंवा कादंबरीची कथा वाटावी, असं भावे पुस्तकात नमूद करतात.

प्रत्यक्ष आणि पडद्यामागचं वास्तव :

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात प्रत्यक्ष काय घडलं आणि पडद्यामागे काय घडत होतं, याचा सविस्तर लेखाजोखा या पुस्तकात देण्यात आला आहे, असं भावे सांगतात.

या पुस्तकामुळे पुन्हा एकदा डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाची चर्चा रंगणार असून, यामधून नवे पैलू समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, या पुस्तकातील दाव्यांवर कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर काय प्रतिक्रिया उमटतील, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण नेमकं काय? 

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी सातच्या सुमारास पुण्यात ओंकारेश्वर पुलाजवळ गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. डॉ. दाभोळकर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक होते आणि अंधश्रद्धेविरोधात कठोर कायदा आणण्याच्या मागणीसाठी त्यांनी लढा दिला होता.

त्यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारने प्रथम पुणे पोलिसांकडे सोपवली होती. मात्र, पुढे या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणात काहीजणांना अटक झाली असून, सनातन संस्था आणि हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित काही व्यक्तींवर संशय घेतला गेला. या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sharad Pawar and Ajit Pawar : मोठी बातमी : इकडं ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा, तिकडे शरद पवार-अजितदादांमध्ये बैठकांचा धडाका, काका-पुतण्यात मनोमिलन होणार?

 

 

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget