Narendra Chapalgaonkar : वर्ध्यातील 96 व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक आज (8 नोव्हेंबर) वर्धात पार पडली. या बैठकीत यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर (Narendra Chapalgaonkar) यांची निवड करण्यात आली आहे.
Narendra Chapalgaonkar: 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan ) अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर (Narendra Chapalgaonkar) यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक आज (8 नोव्हेंबर) वर्धात पार पडली असून याच बैठकीत 96 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि वैचारिक लेखनासाठी प्रसिद्ध असलेले नरेंद्र चपळगावकर यांच्यामध्ये संमेलनाध्यक्षपदीसाठी चुरस होती. पण आज नरेंद्र चपळगावकर यांची 96 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चपळगावकर यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी नरेंद्र चपळगावकर म्हणले, 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा मराठी भाषा मराठी साहित्य यांच्याबद्दल आपलं मत मांडण्याची मोठी संधी आहे, असं मी मानतो. ही संधी मला दिल्याबद्दल मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आभार मानतो.'
कोण आहेत नरेंद्र चपळगावकर?
नरेंद्र चपळगावकर हे वैचारिक लेखन करणारे एक संवेदनशील लेखक आहेत. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश असून न्यायाधीश होण्यापूर्वी ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. नरेंद्र चपळगावकर यांनी संघर्ष आणि शहाणपण, दीपमाळ, आठवणीतले दिवस आणि कायदा आणि माणूस यांसारख्या पुस्तकांचे लेखन केले.
पुण्यात जानेवारी 2012 रोजी झालेल्या 13 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद नरेंद्र चपळगावकर यांनी भूषवले होते. तसेच मार्च 2014 मध्ये झालेल्या 9 व्या जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील चपळगावकर हेच होते. 2011 मध्ये भैरुरतन दमाणी पुरस्कारानं चपळगावकर यांना गौरवण्यात आलं होतं.
वर्ध्यात पार पडणार साहित्य संमेलन
त्यानुसार 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात घेण्यात यावे असे विदर्भ साहित्य संघाने सुचविले होते. त्या अनुषंगाने 96 वे महामंडळाच्या स्थळ निवड समितीने वर्ध्याला भेट दिली, तिथली मैदान आणि वाहन तळची पाहणी केली. ती योग्य असल्याचे पाहून स्थळ निवड समितीने वर्ध्यात पुढचे साहित्य संमेलन घेण्यात यावे अशी शिफारस केली. त्यानुसार अखिल भारतीय साहित्य महामं9ळाने पुढचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात घेण्याचे निश्चित केले आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Sahitya Sammelan: 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात होणार