एक्स्प्लोर
नारायण राणे उद्या दिल्लीत, अमित शाहांची भेट घेणार!
दिल्लीत भाजपच्या कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतील.
मुंबई : काँग्रेसमधून नुकतेच बाहेर पडलेले नेते नारायण राणे उद्या दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत भाजपच्या कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतील. अमित शाहांना ते सिंधुदुर्गातील रुग्णालयाच्या उद्घाटनाचं निमंत्रण देतील.
नारायण राणे यांनी नुकताच काँग्रेसला रामराम केला आहे. त्यामुळे ते एकतर नवीन पक्षाची स्थापना करतील किंवा भाजपात जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि नारायण राणे यांच्या भेटीने आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळालं आहे.
“तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो,” अशा शब्दात नारायण राणे यांनी विधानपरिषद आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. कुडाळमधील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
“काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची आश्वासनं दिली मात्र कधीच पाळली नाही. 26 जुलै 2005 रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण या 12 वर्षात माझ्या कामाचा, अनुभवाचा फायदा करुन घेतला नाही,” असं म्हणत राणेंनी काँग्रेसवर आसूड ओढलं. “आम्ही राणेंना घाबरतो, असं काँग्रेस समोरुन दाखवत असे. पण दिल्लीत मला वेळ मिळायची नाही,” अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement