एक्स्प्लोर
तळकोकणात नारायण राणेंचा शिवसेनेला धोबीपछाड; प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मिळवला विजय
शिवसेनेचे आमदार आणि माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांना आज दुहेरी धक्का बसला आहे. कारण, तळकोकणात सावंतवाडी नगरपरिषद पोटनिवडणुकीची मतमोजणीत भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी बाजी मारली आहे.
रत्नागिरी : तळकोकणात सावंतवाडी नगरपरिषद पोटनिवडणुकीची मतमोजणीत भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेला चितपट केलं आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजु परब 313 मतांनी विजयी झाले आहेत. सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत नारायण राणे यांचे समर्थक असलेल्या संजु परब यांचा विजय झाल्याने सावंतवाडीत तब्बल 28 वर्षांनी परिवर्तन झालं आहे.
आतापर्यंत या नगरपरिषदेवर शिवसेना नेते आणि आमदार दीपक केसरकर यांचं वर्चस्व होतं. नगरपरिषद निवडणुकीतील शिवसेनेचा पराभव हा केसरकरांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. नारायण राणे आणि दिपक केसरकर या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा या निवणुकीत पणाला लागली होती.
सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्यात चांगलंच वाक्य युद्ध रंगलं होतं. सावंतवाडी नगरपरिषदेत फक्त 18 हजार मतदार असले तरी इथे नारायण राणे आणि दिपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती.
अखेर सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार संजु परब यांचा विजय झाला आहे. खरंतर सावंतवाडी ही दीपक केसरकर यांचा बल्लेकिला होता. नारायण राणे यांनी केसरकराच्या या बल्लेकिल्याला अखेर सुरुंग लावला. दीपक केसरकर यांना आज दोन धक्के बसले आहेत. एक सावंतवाडीच्या बल्लेकिल्ल्यात राणेंनी धक्का दिला तर दुसरीकडे राज्याच्या मत्रिमंडळात स्थान नसल्याने दुसरा धक्का दिपक केसरकर यांना बसला आहे.
दीपक केसरकरांचा मंत्रिमंडळात समावेश नाही -
आज ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आहे. यात आदित्य ठाकरेसह शिवसेनेचे 11 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, यावेळी दिपक केसरकरांना वगळण्यात आले आहे. फडणवीस सरकारमध्ये ते गृह राज्य मंत्री होते.
हे आमदार घेणार शपथ -
आदित्य ठाकरे (मुंबई)
अनिल परब (मुंबई)
उदय सामंत (रत्नागिरी)
गुलाबराव पाटील (जळगाव)
दादा भुसे (मालेगाव, नाशिक)
संजय राठोड (दिग्रस, यवतमाळ)
संदीपान भुमरे (पैठण, औरंगाबाद)
शंकरराव गडाख , नेवासाचे अपक्ष आमदार (नेवासा, अहमदनगर)
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) (सिल्लोड, औरंगाबाद)
राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (शिरोळ, कोल्हापूर)
शंभूराज देसाई (राज्यमंत्री) (पाटण, सातारा)
बच्चू कडू, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (अचलपूर, अमरावती)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement