(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रिफायनरीसाठी नारायण राणे सकारात्मक'; समर्थकांनी घेतली राणेंची दिल्लीत भेट
राजापूर तालुक्यातील नाणार गावात झालेल्या विरोधानंतर शिवसेनेनं प्रकल्पाची अधिसुचना रद्द केली. पण, सध्या बारसू- सोलगाव या ठिकाणी याबाबतची चाचपणी सुरू आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरणाचा कारखाना व्हावा यासाठी सध्या काही संघटना, स्थानिक प्रयत्न करत आहेत. पण, विरोध देखील कायम आहे. त्यामुळे अद्याप देखील याबाबतचा ठोस निर्णय झालेला नाही. शिवसेनेनं नाणार येथील अधिसुचना रद्द केल्यानंतर आता राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव या ठिकाणी चाचपणी सुरू आहे. दरम्यान, स्थानिकांचं मत लक्षात घेता शिवसेना नवीन जागेबाबत देखील विरोध करत आहे. स्थानिकांचं मत तेच आमचं मत असं यावेळी शिवसेनेचं म्हणणं आहे, पण, असं असलं तरी रिफायनरी व्हावी यासाठी प्रयत्न करणारे स्थानिक ज्यांना समर्थक म्हणता येईल ते अद्याप देखील आशावादी आहेत. 'सध्या आम्ही निर्णायक लढाई लढत आहोत' अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. त्यानंतर आता रिफायनरीचे समर्थक असलेल्या कोकण जनकल्याणउद्योग भवन येथे ही बैठक झाली. जवळपास तासभर झालेल्या बैठकीनंतर नारायण राणे प्रकल्प व्हावा यासाठी सकारात्मक असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेकर यांनी दिली आहे. त्यामुळे कोकणातील रिफायनरी प्रकल्पाबाबत आणि राणे यांच्या जाहीर भूमिकेकडे यापुढे लक्ष असणार आहे.
राणे - समर्थक भेटीत काय चर्चा?
जवळपास तासभर झालेल्या चर्चेत मागील चार वर्षातील विविध समर्थक संघटनांनी केलेली आंदोलने, मोर्चे,स्थानिक शेतकरी यांनी दिलेली सुमारे 8500 एकर जमिनीची प्रकल्पासाठी दिलेली संमतीपत्रे, विविध गाव आणि संघटनांनी रिफायनरी सामर्थनाचे केलेले ठराव या बाबतची माहिती देण्यात आल्याचं माहिती आंबेरकर यांनी दिली आहे. शिवाय, पूर्वीची जमीन अधिग्रहण अधिसूचना रद्द झाल्यानंतर विरोधाचे सीमेलगतचे भाग, वाड्या, गावे वगळून स्थानिक जमीन मालकांनी दिलेल्या संमातीच्या आधारे सुधारित केलेल्या जमिनीच्या नकाशाबाबतही राणे यांना माहिती देण्यात आली आहे.
प्रकल्पावरून सेना - राणे समोरासमोर?
नारायण राणे सध्या भाजपमध्ये आहेत. भाजप या प्रकल्पासाठी अनुकूल असून राणेंची विरोधाची भूमिका देखील आता राहिली नाही. 'जनतेचं म्हणणं तेच आमचं' अशी भूमिका यापूर्वीच राणे कुटुंबियांनी घेतली आहे, त्यामुळे सध्या शिवसेना आणि राणे यांच्यातील राजकीय वैर पाहता भविष्यात याबाबत दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप - प्रत्यारोप होणार हे नक्की. त्यामुळे आगामी काळात राणे आणि शिवसेना यांच्यातील वादात किंवा आरोपांच्या फैरीमध्ये रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा असणार हे देखील नक्की!
सध्या रिफायनरीबाबत नागरिकांचं काय मत?
राजापूर तालुक्यातील नाणार गावात झालेल्या विरोधानंतर शिवसेनेनं प्रकल्पाची अधिसुचना रद्द केली. पण, सध्या बारसू- सोलगाव या ठिकाणी याबाबतची चाचपणी सुरू आहे. सध्या तालुक्यातील काही गावांनी रिफायनरी समर्थनार्थ ठराव केले आहेत. शिवाय, शिवसेनेचे काही स्थानिक पदाधिकारी देखील याबाबत सकारात्मक आहेत. पण, असं असलं तरी होत असलेला विरोध दुर्लक्षित करून चालणार नाही.