...म्हणून मी शिवसेना सोडली, नारायण राणेंनी सांगितलं शिवसेना सोडण्याचं कारण?
भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडण्याचे कारण सांगितले आहे. बाळासाहेब ठाकरे हयातीत असतानाच नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता.
Narayan Rane : भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडण्याचे कारण सांगितले आहे. बाळासाहेब ठाकरे हयातीत असतानाच नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात मी काम केले. साहेब गेल्यानंतर शिवसेना राहिली नाही म्हणून मी तुमच्याप्रमाणे शिवसेना सोडून भाजपमध्ये आल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. देशात सत्ता भाजपची असल्याचे राणे म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षात भारत जागतिक अर्थव्यवस्थेत 14 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर नेला आहे. काही वर्षात भारत जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर असेल असेही नारायण राणे म्हणाले. नारायण राणे आज चिपळूणमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना सोडण्यासंदर्भात वक्तव्य केलं.
नारायण राणेंचा राजकीय कारकिर्द
नारायण राणे यांनी शिवसेनेपासून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास 1968 पासून म्हणजे वयाच्या 16 व्या वर्षीपासून सुरु झाला होता. 1968 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या चेंबूर येथील शाखेत शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली होती. 1985 ते 1990 या काळात शिवसेनेचे नगरसेवक त्यानंतर बेस्टचे अध्यक्षपद भूषवले होते. 1990 ते 95 या काळात नारायण राणे पहिल्यांदा विधानसभेवर गेले. 1991 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षातील त्यांचे महत्त्व वाढले. 1990 ते 95 याच काळात नारायण राणे हे विधानपरिषदेचे विरोधपक्ष नेतेपद राहिले. 1996 ते 99 युती सरकार आल्यानंतर राज्याच्या महसूल मंत्रीपदी विराजमान झाले होते. 1999 मध्ये ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती.
2005 साली शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद
2005 साली शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद झाले. त्या मतभेदानंतर 3 जुलै 2005 रोजी शिवसेना सोडली. 2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश. शिवसेना सोडल्यावर काँग्रेसतर्फे मालवणमधून विक्रमी मतांनी विजयी झाले होते. 2005 आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्रीपदी निवड झाली. त्यानंतर 2007 साली काँग्रेसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात बंड केले. 2008 मध्ये पक्षविरोधी टिप्पणीमुळे काँग्रेसमधून निलंबन केले. 2009 मध्ये विधानसभेनंतर उद्योग मंत्रीपदावर घसरण. 2014 मध्ये लोकसभेला पुत्र निलेश राणे यांच्या पराभावनंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 2014 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी झुलवल्याच्या नाराजीतून पुन्हा मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघातून शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून राणेंचा पराभव. त्यानंतर 2015 मध्ये वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतही राणेंचा पराभव झाला. शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी राणेंना पराभूत केलं होते. त्यानंतर 2019 मध्ये नारायण राणेंनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलीन केला होता. कणकवलीमध्ये आज आयोजित फडणवीस यांच्या प्रचारसभेत राणे तसंच त्यांचे चिरंजीव निलेश राणे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.
महत्वाच्या बातम्या:


















