एक्स्प्लोर
पोलिसाची ऑन ड्युटी आत्महत्या, वरिष्ठांवर जाचाचा आरोप

नंदुरबार : नंदुरबारमध्ये पोलिस कर्मचारी अशोक बच्छाव यांनी ऑन ड्युटी फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून बच्छाव यांनी जीव दिल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. नंदुरबारमधील उपनगर पोलिस स्टेशनचे हवालदार अशोक बच्छाव यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणाला नवीन कलाटणी मिळाली आहे. बच्छाव यांच्या कुटुंबीयांनी सुसाईड नोटच्या आधारे पोलिस निरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गेल्या महिन्याभरापासून नवापुर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना एका प्रकरणात पोलिस निरीक्षक रामदास पाटील, निवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक कासार आणि पोलिस नाईक दिलीप चौरे यांनी अशोक बच्छाव यांना अडकवण्याची धमकी दिली होती. पोलिस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळूनच बच्छाव यांनी आत्महत्या केल्याचा आरोप बच्छाव यांचे कुटुंबीय करत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























