एक्स्प्लोर
जिल्हा परिषद शाळेतील खिचडीत निघाला साप
खिचडी खाण्याच्या पूर्वी शिक्षक तपासणी करत असताना एका विद्यार्थ्यांच्या ताटात हा साप अढळला. त्यामुळे विद्यार्थ्यांना खिचडी न खाण्याचा सल्ला शिक्षकांनी दिला. यानंतर शिक्षकांनी खिचडीची विल्हेवाट लावली.

नांदेड : आजपर्यंत आपण जिल्हा परिषदेच्या शाळेतील गलथान कारभारामुळे खिचडीत पाल, उंदीर, पडून विषबाधा झाल्याच्या घटना ऐकल्या आहेत. मात्र, नांदेड जिल्ह्यातील शाळेच्या खिचडीत चक्क साप शिजल्याने एकच खळबळ उडाली आहे. हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत काल हा धक्कादायक प्रकार घडला आहे. खिचडी खाण्याच्या पूर्वी शिक्षक तपासणी करत असताना एका विद्यार्थ्यांच्या ताटात हा साप अढळला. त्यामुळे विद्यार्थ्यांना खिचडी न खाण्याचा सल्ला शिक्षकांनी दिला. यानंतर शिक्षकांनी खिचडीची विल्हेवाट लावली. विद्यार्थ्यांना खिचडी खाऊ न दिल्याने कुणाच्याही आरोग्याला धोका नसल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. दरम्यान, शाळेच्या गलथान कारभारावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच नांदेडच्या शिक्षण विभागाचे पथक शाळेत दाखल झाले असून आता चौकशी सुरू केली आहे.
आणखी वाचा























