(Source: Poll of Polls)
क्रिकेट खेळत असताना अंगावर कोसळली वीज, नांदेडमध्ये तरुणाचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. नांदेडमध्ये वीज कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेख अल्ताफ राहणार धनेगाव वय 35 असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
Nanded : गेल्या आठ दिवसापासून राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला होता. आता पुन्हा एकदा राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, यावेळी नांदेड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. नांदेडमध्ये वीज कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेख अल्ताफ राहणार धनेगाव वय 35 असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
वीज पडल्याची घटना सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घडली
वीज पडल्याची घटना सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घडलेली आहे. शेख अल्ताफ हा वाजेगाव येथे क्रिकेट खेळत असताना त्याच्या अंगावर वीज कोसळली आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटने संदर्भात नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्याची नोंद सुरू आहे.
गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता. बऱ्यापैकी ठिकाणी पावसानं उघडीप दिली होती. मात्र, आजपासूनपुन्हा राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एन दिवाळीमध्ये मुंबईसह ठाणे, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पश्चिम उपनगरात मागील 15 ते 20 मिनिटांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड विलेपार्ले या सर्व परिसरात पावसाच्या जोर जास्त आहे. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.
पुढील तीन तास महत्वाचे
पुढील 3 तासांत पुणे, रायगड, रत्नागिरी येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 40 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन करण्यात आले आहे.
ढगांच्या गडगडाटासह कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस
कोल्हापूरमध्ये देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसानं अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा खोळंबा झाला होता. सकाळपासून कडकडीत उन्ह आणि संध्याकाळी पावसाची हजेरी लावली होती.
छत्रपती संभाजीनगर अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस
आधीच अतिवृष्टीमुळे अडचणी सापडलेल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पैठण आणि वैजापूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये दुपारनंतर पावसाने हजेरी लावली.




















