Nanded : 'आधी लगीन रायबाचं'... अध्यक्षीय निवडीच्या दिवशी सभागृहात गैरहजर... आमदार जितेश अंतापूरकर बोहल्यावर
'आधी लगीन कोढाण्याचं... मग रायबाचं' असं म्हणणाऱ्या काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकरांचा विवाह सोहळा आज थाटात संपन्न झाला.
नांदेड: राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरू असताना, एकेक आमदाराचे मत बहुमोल असताना नांदेडमधील देगलूरचे आमदार मात्र बोहल्यावर चढले आहेत. आज विधानसभा अध्यक्षपदाची निवड सुरू असताना काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरककर यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला.
देगलूरचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या लग्नातील विधी टाळून राजधानीत दाखल झाले होते. आमदार अंतापूरकर हे मुंबईवरुन नांदेडला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी येत असताना त्यांना त्याचवेळी विधीमंडळ सचिवालयातून गुरूवारी होणार्या बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी फोन आला होता. त्यामुळे लग्नघटिका समीप येत असतानासुद्धा लग्न कार्याच्या विधीस फाटा देत 'आधी लगीन कोंढण्याचं' म्हणत आमदार जितेश अंतापूरकर मुंबईत उपस्थित होते. आता मात्र त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवेळी हजेरी न लावता बोहल्यावर चढण्याला प्राधान्य दिलं.
राहुल नार्वेकरांची निवड
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. आता अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: