एक्स्प्लोर

नांदेडच्या नायगाव धरण गावातील चौथीचे विद्यार्थीही दारुच्या आहारी, देशी दारुचं दुकान बंद करण्यासाठी महिलांचा ठिय्या

नांदेडच्या नायगाव धरण गावातील पुरुषवर्ग दारुच्या अधीन गेला होताच, आता चौथीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थीही दारु पिऊन गावात धिंगाणा घालत आहेत. यामुळे त्रस्त महिलांनी देशी दारुचं दुकान बंद करण्याची मागणी करत धर्माबादच्या तहसील कार्यालायासमोर ठिय्या मांडला.

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील नायगाव धरण गावात देशी दारुच्या दुकानामुळे गावात मद्यापींचा त्रास वाढला आहे. नायगाव धरण गावातील दुकानामुळे पुरुषवर्ग दारुच्या अधीन गेला होताच, परंतु आता याचा आणखीही विपरीत परिणाम झाला आहे. कारण अगदी चौथीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थीही दारु पिऊन गावात धिंगाणा घालत आहेत. या घटनांमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी नायगाव धरण इथलं देशी दारुचं दुकान बंद करण्याची मागणी करत धर्माबादच्या तहसील कार्यालायासमोर ठिय्या मांडला.

नायगाव धरण गावातील या दारु दुकानामुळे सुरुवातीला पुरुषवर्ग मद्यपी आणि व्यसनाधीन झाला. परंतु आता चौथीच्या वर्गात शिकणारे मुले दहा-दहा रुपये जमवून एकत्र येत दिवसाढवळ्या दारु पीत असल्याचे चित्र आहे.

नांदेडच्या नायगाव धरण गावातील चौथीचे विद्यार्थीही दारुच्या आहारी, देशी दारुचं दुकान बंद करण्यासाठी महिलांचा ठिय्या

धर्माबाद तालुक्यातील नायगाव धरण हे गाव तेलंगाणा राज्यालगत आहे. या गावात तेलंगणापेक्षा दारु स्वस्त मिळते. त्यामुळे या गावात तेलंगणातील लोकांची सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत ये-जा राजरोस सुरु असते. शिवाय गावातील बहुतांश पुरुष मंडळी मद्यपी बनले. आता त्यात चौथीच्या वर्गात शिकणारी कोवळी मुलेही दारुच्या आहारी गेल्याचं चित्र आहे. गावातील महिला शेतकामासाठी घराबाहेर गेल्यानंतर ही मुले दारु पिऊन गावभर धिंगाणा घालतात. त्यामुळे या बायबापड्यानी गावातील हे देशी दारु दुकान बंद व्हावे आणि आमची पुढची पिढी वाचावी ही मागणी घेऊन धर्माबाद तहसील कार्यालया समोर ठिय्या दिला.

गावातील महिलांच्या प्रतिक्रिया रेखा गडामोड "लॉकडाऊनमुळे घरी असल्यामुळे आमची लहान मुले दररोज पार्टी करतात. आम्ही शेताच्या कामाबासाठी घराबाहेर गेल्यावर ही मुलं दहा-दहा रुपये जमा करुन बॉटल विकत घेतात आणि दारु प्यायला बसतात. घरी आल्यावर आम्हाला लेकरं, नवरा सगळ्यांचाच त्रास आहे," असं रेखा गडामोड या महिलेने सांगितलं. देऊबाई कदम "देशी दारु बंद करण्याच्या मागणीसाठी धर्माबादच्या तहसील कार्यालयात आलेले आहोत. देशी दारुमुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. आमचे नवरे दारु पितातच आता लहान लेकरंही दारु प्यायला लागली आहेत. शिवाय दारु पिऊन घरातील महिलांना मारहाण देखील करतात," असं या गावातील देऊबाई कदम म्हणाल्या. "स्त्रियांना खूप त्रास होत आहे. शाळा बंद असल्यामुळे लेकरं दारु पिऊन धिंगाणा घालत आहेत. नवरे पत्नीला सोडायला तयार आहेत, पण देशी दारु सोडायला तयार नाहीत," अशी प्रतिक्रिया गावातील आणखी एका महिलेने दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Embed widget