एक्स्प्लोर

Namita Thapar Forbes : फोर्ब्सच्या पॉवरफुल बिझनेस वुमनच्या यादीत पुण्याच्या नमिता थापर यांच्यासह दोन महिलांचा समावेश

फोर्ब्सच्या 20 आशियाई उद्योजक महिलांच्या यादीत तीन भारतीयांचा समावेश आहे. त्यात पुण्याच्या एमक्योर फार्माच्या इंडिया बिझनेसच्या कार्यकारी संचालक नमिता थापर यांचा समावेश आहे.

Namita Thapar Forbes : फोर्ब्सच्या (Forbes) 20 आशियाई उद्योजक महिलांचीच यादी जाहीर झाली असून या यादीत तीन भारतीयांचा समावेश आहे. त्यात पुण्याच्या एमक्योर फार्माच्या इंडिया बिझनेसच्या कार्यकारी संचालक नमिता थापर (Namita Thapar) यांचा समावेश आहे. नमिता थापर यांचा या यादीत सामावेश झाल्याने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर पुण्याचं नाव उंचावलं आहे. त्यांच्यासोबतच स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्षा सोमा मंडल, आणि होनासा कंझ्युमरच्या सह-संस्थापिका आणि मुख्य नवोपक्रम (Innovation) अधिकारी गझल अलघ यांचा देखील समावेश आहे. भारतातील कोरोनाच्या काळात अनिश्चितता असूनही ज्या महिलांनी आपल्या व्यावसायात नवी धोरणं आखली आणि मोठी उंची गाठली आहेत, अशा आशियाई 20 महिलांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. 

विविध क्षेत्रातील महिला
या यादीतील काही महिला शिपिंग, रिअल इस्टेट आणि बांधकाम यांसारख्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करत आहेत तर काही तंत्रज्ञान, औषध आणि कमोडिटी यासारख्या क्षेत्रात नवनवीन शोध घेत आहेत. या यादीतील इतर महिला ऑस्ट्रेलिया, चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, जपान, सिंगापूर, तैवान आणि थायलंडमधील आहेत.

कोण आहे नमिता थापर?
नमिता थापर या एमक्योर फार्माच्या इंडियाच्या  (Emcure Farms India)  कार्यकारी संचालक आहेत.  त्यांचा जन्म पुण्यात झाला आहे. पुण्यातील महविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं आहे. इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातून त्यांनी चार्टर्ड अकाउंटंटचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी फुका स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं आहे. कोरोनाच्या काळात महिलांचे आरोग्य लक्षात घेऊन त्यांनी नमितासोबत अनकंडिशन युवरसेल्फ नावाचा यूट्यूबवर टॉक शो सुरू केला.  इकॉनॉमिक टाइम्स अंडर 40 अवॉर्ड, बार्कले हुरुन नेक्स्ट जेन लीडर अवॉर्ड, इकॉनॉमिक टाइम्स 2017 वुमन अहेड अवॉर्ड, असे अनेक अवॉर्ड त्यांना मिळाले आहेत.

शार्क टॅंक इंडियामध्ये परीक्षक
काही महिन्यापूर्वी सोनी टीव्हीवरील शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमात त्या परीक्षक होत्या. हा कार्यक्रम भारतातील स्टार्टअप व्यावसायिकांसाठी होता. सोनीवरील या कार्यक्रमामुळे नवोदित उद्योजकांना त्यांच्या उद्योग वाढवण्यासाठी फंड दिला गेला. मोठ्या कंपन्यांनी स्टार्टअपसाठी मदत करावी आणि त्यात गुंतवणूक करावी, असा या कार्यक्रमाचा उद्देश होता. याच कार्यक्रमात नमिता थापर यांनी देखील अनेक लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. 

गझल अलघ, सोमा मंडल यांचाही समावेश
गझल अलघची कंपनी मामा अर्थ नावाची कंपनी आहे. त्या होनासा कन्झूमरच्या सह-संस्थापिका आणि मुख्य नवोपक्रम अधिकारी आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठातून बीसीए पूर्ण केले. पुढे त्यांनी व्हिज्युअल आर्ट्समध्ये शिक्षण पूर्ण केले तर सोमा मंडल या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) च्या सध्याच्या अध्यक्षा आहेत. सोमा मंडल या सेलच्या पहिल्या महिला कार्यकारी संचालक तसेच पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :   8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBatenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली,
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली, "कसाटा खाण्याची इच्छा होती, तर..."
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Embed widget