एक्स्प्लोर
मैत्रिणीकडे पाहिल्याचा राग, नागपुरात 32 वर्षीय तरुणाची हत्या
आरोपीने विजय यादववर धारदार हत्याराने वार केले, यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

प्रातिनिधिक फोटो
नागपूर : मैत्रिणीकडे पाहिल्याच्या रागातून नागपुरात 32 वर्षीय युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्री धारदार शस्त्राने वार करुन विजय यादवला जीवे मारण्यात आलं.
आपल्या मैत्रिणीकडे सातत्याने पाहत असल्याचा राग आरोपीच्या मनात होता. याचा जाब आरोपीने विजयला विचारल्यावर बुधवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपीने विजयवर धारदार हत्याराने वार केले. यामध्ये विजयचा मृत्यू झाला.
नागपूरच्या जुनी मंगळवारी परिसरातील मासुरकर चौकजवळ ही घटना घडली. हत्या झालेला विजय बहादूर यादव मूळ उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याचे इतर साथीदार आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
सोलापूर
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement























