एक्स्प्लोर
नागपुरात पती आणि मुलाची हत्या करुन महिलेची आत्महत्या
नागपूर : नागपूरमध्ये पतीसह आपल्या 5 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करुन एका महिलेने आत्महत्या केली आहे. आलम कुटुंबातील या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
महिलेने आपल्या पती व मुलाला खाद्यपदार्थातून गुंगीचं औषध दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृत पतीचं नाव सर्वर आलम असून मुलाचं नाव दादू आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
आलम कुटुंब हे मूळचं कानपूरमधील असून 8 महिन्यांपूर्वी ते नागपूरमध्ये आले होते. ते परिसरात कोणाशी जास्त संबंध ठेवत नव्हते. दिवसभर आलम कुटुंब कोणालाच दिसले नाही. संध्याकाळी घरचे नळ वाहत असल्यामुळे शेजाऱ्यांनी दार वाजवलं. कोणीच प्रतिसाद न दिल्यामुळे पोलिसांना बोलवण्यात आलं आणि ही घटना उघडकीस आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement