एक्स्प्लोर

नागपुरात राजकीय पारा तापला! काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंचा आक्रमक पवित्रा; भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना समज द्यावी, अन्यथा...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर नागपुरात भाजप चांगलीच आक्रमक झालीय, अशातच आता काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.

Lok Sabha 2024 Nagpur : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार (Vilas Muttemwar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर नागपुरात भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झालीय. विलास मुत्तेमवार यांच्या घरासमोर भाजप आणि भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत नारेबाजी केलीय. त्यामुळे नागपुरातील उष्णतेच्या पाऱ्यासह राजकीय पारा देखील कमालीचा तापला असल्याचे बघायला मिळत आहे. अशातच आता काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपच्या नेत्यांना सज्जड दम भरला आहे.

भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी. अन्यथा निवडणूक जाईल दुसऱ्या बाजूला आणि इथे वेगळंच काही घडेल, असा इशारा विकास ठाकरे यांनी दिला आहे. आम्हाला शहराची शांतता कधीही भंग करायची नाही. मात्र, सत्ताधाऱ्यांनी आपला संयम बाळगून विरोध करावा. शांतप्रिय नागपूर शहरात चुकीचा पायंडा कोणीही पाडू नये, असेही विकास ठाकरे म्हणाले. 

भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना समज द्यावी, अन्यथा...

काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी जे वक्तव्य केलं होतं ते 'अबकी बार चरसो पार' हा जो भाजपचा नारा आहे त्याबाबत केले होते. मात्र यामध्ये कुणाचेही नाव अथवा तसा उल्लेख त्यात केलेला नव्हता. असे असताना या लोकशाहीमध्ये कोणी बोलले तर तुम्ही त्याच्या घरावर जात आहात. म्हणजे जर आता तेवढाही अधिकार नसेल तर मग याबाबत विचार केला पाहिजे. घरावर केवळ यांनाच येता येत का, आमच्याकडे देखील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आहेत. आम्ही जर असा विचार केला तर या शहराची शांतता भंग झाल्याशिवाय राहणार नाही.

मात्र, आम्ही तसे कदापि करणार नाही. आम्ही रीतसर निवडणूक आयोग किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे याबाबत तक्रार करू. आज यांचे 20 लोक रस्त्यावर आलेत तर उद्या आमचे कितीतरी पट जास्त संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. मात्र ही पद्धत अतिशय चुकीची असून याचे समर्थन कोणीही करणार नाही. आपल्याला निवडणूक सोडून हे बाकीचे उद्योग करायचे आहेत का? मात्र, असे असताना सत्ताधारी पक्षांनी जरा संयमाने वागलं पाहिजे. असा सल्लाही काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. 

भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल व्हावे - विकास ठाकरे 

भाजप कार्यकर्त्यांची ही पद्धत अतिशय चुकीची असून असा पायंडा कधीही पडता कामा नये. आज नागपूर मतदारसंघात सर्वच पक्षातील उमेदवार आहेत. त्यामुळे इतर सर्व भाजप विरोधात जाऊन आज निवडणूक लढत आहेत. त्यामुळे आमच्या कडे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे मनुष्यबळ आहे. एक बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचल्यास मोठा असंतोष निर्माण होईल. आम्हाला नागपूर शहरातली शांतता कधीही भंग होऊ द्यायची नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी. सोबतच या प्रकरणातील जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी ही विकास ठाकरे यांनी बोलताना केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget