एक्स्प्लोर
पत्नी आणि मुलीला पाहण्यासाठी त्यानं जेलची भिंत ओलांडली
नागपूर: नागपूरमधील जेलब्रेकमागे एक धक्कादायक कौटुंबिक कहाणी असल्याचं उघड झालं आहे. पत्नी आणि मुलीचा विरह सहन न झाल्यानं यातील एका कैद्यानं चक्क जेलच्या भिंती ओलांडल्या
31 मार्च 2015 रोजी सत्येंद्र गुप्ता, सोहेल खान, प्रेम नेपाळी, आकाश ठाकूर आणि बिसेन सिंह. पाच कुख्यात कैद्यांनी नागपूर जेलची भली मोठी भिंत ओलांडली आणि ते पसार झाले.
मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधून कैदी पसार झाल्यानं जेल प्रशासनाची शोभा झाली. 5 अधिकारी, 12 कर्मचारी निलंबित झाले. पण 4 महिन्याच्या आतच 5 पैकी 4 कैद्यांना जेरबंद करण्यात आलं. पण एक कैदी अजूनही फरार होता. ज्याचं नाव होतं. बिसेन सिंह.
बिसेन सिंहच्या पत्नीनं 2012 साली एका गोंडस पोरीला जन्म दिला. आपल्या पत्नीचा विरह आणि मुलीचं तोंड पाहण्याच्या इच्छेनं बिसेन अस्वस्थ होता. त्याचवेळी जेलमध्ये पळून जाण्याचा कट इतर चौघे रचत होते. त्याच कटात बिसेनही सामिल झाला.
31 मार्चपासून बिसेन सिंह आपल्या पत्नीला शोधण्यासाठी मध्यप्रदेशातल्या धुमामाळमध्ये दाखल झाला. सुमारे 13 महिने त्याचा शोध सुरु होता. गावा शेजारच्या जंगलात कंदमुळे, फळे खाऊन जगू लागला. मिळतीतून त्याने एक फोनही विकत घेतला. ज्या द्वारे पत्नीचा शोध सुरु होता. कधी कधी तो गावातही येत असे. पण पुन्हा जंगलात गायब होत असे.
13 महिने वनवास भोगल्यानंतरही बिसेनला त्याचा परिवार भेटला नाही. उलट त्याचा प्रवास जिथून सुरु झाला. तिथेच संपला. त्याला पुन्हा अटक करण्यात आली आणि पुन्हा त्याची रवानगी नागपूर जेलमध्ये करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement