एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांचे कष्ट आणि डॉ. तोडकरांच्या हेल्थ टिप्स
नागपूर : राजकारण म्हटलं की धावपळ आलीच.. सकाळी उठवायला माणसं दारात असतात, ती रात्री झोपेपर्यंत पाठ सोडत नाहीत. त्यामुळे नेत्यांच्या तब्येतीची वाट लागते. त्यामुळे बहुतेक नेते वजनदार होतात.. म्हणजे शंभर किलोपार होतात. प्रकृतीची ही आबाळ होऊ नये, म्हणून वैद्यकीय शिक्षण खात्यानं अधिवेशनाच्या निमित्तानं आमदारांना फिटनेस फंडा दिला.
विधीमंडळ परिसरात डॉ. जयश्री तोडकरांच्या नेतृत्वात एक तपासणी केंद्र उघडलं. ज्याचं उद्घाटन खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केलं. मुख्यमंत्री येऊन गेले, आणि प्रवीण दरेकरांनी पहिला नंबर लावला. आधी बीपी चेक केलं आणि मग वजन. पण काटा बघून त्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली.
दरेकर जातात न जातात तोच मंत्री प्रवीण पोटे आले. त्यांनीही पूर्ण चेकअप करुन घेतलं आणि आता पुढच्या काही दिवसात आपलं टार्गेट ठेवलं ते लठ्ठपणाला हरवण्याचं.
महिला आमदार तर आपल्या फिटनेसबद्दल जरा जास्तच विचार करतात. त्यामुळेच मनिषा चौधरींसह तीन चार आमदार कामकाज सुरु होण्याआधी तपासणी करण्यासाठी आल्या.
अमेरिका आणि चीनच्या पाठोपाठ भारताचा लठ्ठपणात तिसरा नंबर लागतो. भारतात 90 लाखाहून जास्त पुरुष आणि विशेषत: तरुण लठ्ठपणाचे शिकार झाले आहेत. तर महिलांमध्ये हे प्रमाण अतिप्रचंड आहे, कारण हा आकडा 2 कोटीच्या घरात आहे. लठ्ठपणामुळे डायबेटिस, उच्च रक्तदाब, ह्रदयाचे विकार, पक्षाघात अशा रोगांना आमंत्रण मिळतं.
शिवाय पुढच्या पाच वर्षात लठ्ठपणाचं प्रमाण दुप्पट होण्याची भीती आहे. त्यामुळेच गिरीश महाजनांनी लठ्ठपणाविरोधातील मोहिमेची सुरुवात विधीमंडळापासून केली आणि स्वत:ही आमदारांना काही टिप्स दिल्या.
वजनदार असण्यात काही गैर नाही, पण आपल्याला झेपणार नाही, इतकं वजन असण्यातही काही हाशील नाही. त्यामुळे तुम्हीही थोडे कष्ट घ्या. उठा, जागे व्हा आणि वजन कमी होईपर्यंत व्यायाम करणं थांबवू नका.
संबंधित बातम्या :
अधिवेशनात 'वजनदार' आमदारांची फिटनेस टेस्ट
कोण करणार 'काटा' किर्र, नागपुरात आमदारांची वजनचाचणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement