एक्स्प्लोर

नागपूर पदवीधर मतदारसंघाची रणधुमाळी : काँग्रेस भाजपचा किल्ला भेदणार की, भाजप गड राखणार?

विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड समजला जातो. यावेळी इथे महाविकास आघाडी आणि भाजपात थेट सामना रंगणार आहे. भाजपकडून नागपूरचे महापौर संदीप जोशी तर काँग्रेसकडून अभिजीत वंजारी उमेदवार आहेत.

गडचिरोली : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी आणि भाजपात थेट सामना रंगणार आहे. मंगळवारी सात उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता 19 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात भाजपकडून नागपूरचे महापौर संदीप जोशी तर काँग्रेसकडून अभिजीत वंजारी उमेदवार आहेत. या मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर काँग्रेसचे मंत्री डॉ. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार आणि सुनिल केदार यांच्यासाठीही येथे विजय मिळवणं महत्त्वाचं झालं आहे.

'नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघ'... हा मतदारसंघ राज्यात ओळखला जातो तो भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे. 2014 पर्यंत नितीन गडकरींनी सलग अडीच दशकांपेक्षा अधिक काळ या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं. गडकरींपूर्वी इथून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांनीही या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेलं. गेल्या पाच दशकांपासून हा मतदारसंघ भाजपचा अभेद्य बालेकिल्ला आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपच्या या बालेकिल्ल्याला धडक देण्यासाठी काँग्रेस चांगलीच सरसावली आहे. 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या प्रा. अनिल सोलेंनी काँग्रेसच्या बबनराव तायवाडे यांचा 31,259 मतांनी पराभव केला होता. सध्या राज्यात महाआघाडीचं सरकार असल्याने राष्ट्रवादीसोबत शिवसेनाही इथे काँग्रेससोबत आहे. काँग्रेसने येथून अभिजीत वंजारींना रिंगणात उतरवलं आहे. तर भाजपने इथून देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असलेले नागपूरचे महापौर संदीप जोशींना रिंगणात उतरवलं आहे.

इथील भाजपच्या तिकीट वाटपात यावेळी गडकरी-फडणवीस वाद चांगलाच शिगेला पोहोचला होता. यातूनच गडकरी समर्थक विद्यमान आमदार प्रा. अनिल सोले यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यामुळे या निवडणुकीवर गडकरी-फडणवीस वादाचा काही परिणाम होतो का?, याचं राजकीय वर्तुळात मोठं औत्सुक्य आहे. मात्र, या मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक बांधणी मजबूत असल्याने भाजप आपल्या विजयाची गणितं मांडताना दिसत आहे. तर काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारींनी दोन वर्षांपासूनच निवडणुकीची तयारी केल्याने त्यांचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघात नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. फार मोठ्या भौगोलिक विस्तारामुळे या मतदारसंघात प्रचार करताना उमेदवारांची प्रचंड दमछाक होणार आहे. भाजप आणि काँग्रेस उमेदवारांशिवाय येथे वंचित बहुजन आघाडीचे राहुल वानखेडे, विदर्भवादी संघटनांचे नितीन रोंघे आणि मानवाधिकार पक्षाच्या अॅड. सुनिता पाटील हे महत्वाचे उमेदवार आहेत. या उमेदवारांच्या मतविभागणीवरही भाजप-काँग्रेसच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे. सर्वच उमेदवार आकर्षक जाहीरनाम्यातून पदवीधरांना चुचकारण्याचा प्रयत्न करत आहेत.

2014 चा निवडणूक निकाल

उमेदवार                    पक्ष                मते प्रा. अनिल सोले        भाजप             52,485 बबनराव तायवाडे     काँग्रेस            21,226 किशोर गजभिये        अपक्ष             19,455

विजयी उमेदवार : प्रा. अनिल सोले : भाजप : 31, 259 मतं

2020 मधील नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतदार :

कुठे किती मतदान केंद्रे?

जिल्हा        एकूण केंद्र

नागपूर         162 भंडारा           31 गोंदिया          21 वर्धा               35 चंद्रपूर           50 गडचिरोली    21 एकूण          320

नागपूर पदवीधर मतदारसंघ गेल्या पाच दशकांपासून संघ आणि पर्यायाने भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. या निवडणुकीत या बालेकिल्ल्याला काँग्रेस हादरे देणार का? की पाच दशकांची विजयी घोडदौड भाजप कायम ठेवणार? गडकरी-फडणवीस आपला प्रतिष्ठा राखणार? राऊत-वडेट्टीवार-केदार काँग्रेस पक्षाला खरंच विजयश्री मिळवून देणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या 3 डिसेंबरच्या मतमोजणीनंतरच मिळणार आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
Embed widget