एक्स्प्लोर
एकतर्फी प्रेमातून वाद, तरुणीचं लग्न लावल्याने भावाची हत्या
कुही तालुक्यातील खैरलांजी गावात गुरुवारी मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला.
नागपूर : एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीच्या भावाची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. आरोपी सूरज पाटीलने नियोजनपूर्वक काचेने मान आणि छातीवर वार करुन अमोल मेश्रामची हत्या केली.
कुही तालुक्यातील खैरलांजी गावात गुरुवारी मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सूरज पाटीलचे अमोल मेश्रामच्या धाकड्या बहिणीवर एकतर्फी प्रेम होते. सूरज पाटीलने तिच्या कुटुंबीयांकडे लग्नासाठी मागणीही घातली होती. परंतु मेश्राम कुटुंबीयांनी ही मागणी नाकारुन तिचा विवाह मे 2018 मध्ये महाराष्ट्राबाहेर लावून दिला.
यामुळे सूरज पाटील अतिशय संतप्त झाला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसात सूरजने नियोजनपूर्वक अमोलसोबत मैत्री वाढवली होती. अखेर गुरुवारी रात्री सूरजने अमोलला दारु पाजली. तो मद्यधुंद अवस्थेत असतानाच सूरजने काचेने मान आणि छातीवर वार करुन अमोलचा खून केला.
वेलतूर पोलिसांनी आरोपी सूरज पाटीलला अटक केली असून त्याने गुन्हा कबूल केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement