एक्स्प्लोर
नागपुरात स्क्रब टायफस आजाराचा धुमाकूळ, पाच जणांचा बळी
स्क्रब टायफसची लागण माईट किड्याचं पिल्लू असलेल्या चिग्गरमुळे होत असून वेळेत उपचार न घेतल्यास मृत्यू होण्याचा धोका असतो.

नागपूर : नागपुरात ताप, थंडीची लक्षणं असलेल्या स्क्रब टायफसने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला असून तब्बल 18 जण रुग्णालयात भीतीच्या सावटाखाली उपचार घेत आहेत. यावर वेळेत उपचार घेतले नाहीत, तर मृत्यू होण्याचा धोका असतो. स्क्रब टायफसची लागण माईट किड्याचं पिल्लू असलेल्या चिग्गरमुळे होते. हे चिग्गर जंगल आणि गवतात वाढतं. पावसाळ्यात चिग्गरची पैदास जास्त होते. गवतावर चिग्गरचा अधिवास असतो. चिग्गरच्या चाव्यामुळे हातपाय दुखणं, खोकला, ताप, डोकेदुखी आणि उलट्या होतात. स्क्रब टायफसची लक्षणं साधा ताप, थंडी किंवा व्हायरल इन्फेक्शनसारखी असल्यामुळे रुग्णांना आपल्याला स्क्रब टायफसने गाठल्याचं समजायला उशीर होतो. सर्वात जास्त धोकादायक बाब म्हणजे काही वेळा चिग्गर चावल्याने गुप्तांगावर काळे डाग येतात, ज्याकडे दुर्लक्ष होतं. मात्र अशी लक्षणं असलेले किमान 40 टक्के रुग्ण आढळतात, जे गंभीर आहे. स्क्रब टायफसवर सध्या कुठलीही लस उपलब्ध नाही. नागपुरात स्क्रब टायफसचा पहिला रुग्ण आयडेंटिफाय झाला 2012 मध्ये. त्यानंतर एखाद-दुसरा रुग्ण येत होता. मात्र यावेळी चक्क पाच जणांचा जीव गेला. चिग्गरपासून वाचायचं असेल तर अनवाणी पायाने गवतावर न चालण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तुम्हाला ताप किंवा इतर आजार जाणवत असल्यास अंगावर काढू नका. कदाचित स्क्रब टायफस तुमच्या मागावर असू शकतो.
Before You Go
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















