Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुण्यातून धाराशिवला जाण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धाराशिवला कार्यकर्त्यांसोबत बोलून निर्णय घेणार असल्याचं म्हटलं. याशिवाय तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का? रीलस्टार म्हणून हिणवणी केली गेली. पंचायत समिती आणि नगरपालिकेला मतदारसंघात मशालीवर एकही पंचायत समिती जिंकलो नाही, असं ओमराजे निंबाळकर म्हणाले. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत झालेली हेटाळणी कशामुळं झाली याचा शोध घ्यायचा आहे, असं ओमराजे निंबाळकर म्हणाले. चार दिवसात माझा निर्णय जाहीर केला नाही पण माझ्या अख्ख्या कुटुंबाचा उद्धार करतात. ओमराजे ज्यांच्या उपयोगी पडलाय तो माणूस घरातल्या व्यक्तीचा उद्धार करेल असं वाटलं नव्हतं पण ते करण्यात आलं, ते मी सहन केलं. माझ्या कुटुंबानं तुमचं काय वाटोळं केलंय. माझ्या नुसत्या चर्चेनं मी तीन दिवसात वाईट होत असेल तर खरंच वाईट आहे. रीलस्टार म्हणून हिणवणी करतात, रीलस्टार असलेल्या माणसाला मतं टाकतात का? माझ्या वडिलांच्या केसचा निकाल होता, 16 तारीख ठरलेली, 20 तारीख आली. मी धाराशिवला जाऊन निर्णय जाहीर करेन, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं.
दोन्ही पक्षांची भावना आहे, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आहेत. माझी जी काय राजकीय भूमिका आहे ती आज चर्चा करुन स्पष्ट करेनं. सन्माननीय उद्धवजी,सन्माननीय आदित्यजी आणि बाळासाहेबांच्या कुटुंबाबद्दल माझं कधीच अवाक्षर जाणार नाही, गेलेलं नाही. दुर्दैवानं माझी मुलाखत छापली, मी बोललो असेल तर छापावं, न बोलताच छापल्यानं मला दु:ख आहे.





















