एक्स्प्लोर

नागपूरच्या 12 वर्षांच्या चिमुरडीची 'गिनीज बुक'मध्ये नोंद

आजवर हा विक्रम नेपाळच्या 27 वर्षांच्या अर्पण शर्मांच्या नावावर होता. त्यांनी एका मिनिटात 43 वस्तू त्यांच्या क्रमांकांसह पाठ केल्या होत्या. मात्र अर्पण शर्मांच्या अर्ध्या वयाच्या गौरीने एका मिनिटात 50 वस्तू त्यांच्या क्रमांकांसह अचूक ओळखत विश्वविक्रम रचला आहे

नागपूर : काही जणांची स्मरणशक्ती चांगली असते, तर काहींना साध्या गोष्टीही आठवत नाहीत. नागपुरातल्या एका चिमुरडीची अफाट स्मरणशक्ती सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरली आहे. इतकंच नाही, तर 12 वर्षांच्या गौरी कोढे हिने नुकतंच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या तज्ज्ञांसमोर नवे विश्वविक्रम स्थापित केले आहेत. गौरीने आजवर अनेक ट्रॉफीज, अनेक पुरस्कार आणि विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तिच्या अफाट स्मरणशक्तीच्या जोरावर ती सामान्य नागरिकांसह मोठमोठ्या नेत्यांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. मात्र आता गौरीने तिच्या स्मरणशक्तीच्या जोरावर विश्वविक्रम नावावर केला आहे. अवघ्या एका मिनिटाच्या कालावधीत जास्तीत जास्त वस्तू त्यांच्या अचूक क्रमांकांसह पाठ करण्याचा विक्रम... आजवर हा विक्रम नेपाळच्या 27 वर्षांच्या अर्पण शर्मांच्या नावावर होता. त्यांनी एका मिनिटात 43 वस्तू त्यांच्या क्रमांकांसह पाठ केल्या होत्या. मात्र अर्पण शर्मांच्या अर्ध्या वयाच्या गौरीने एका मिनिटात 50 वस्तू त्यांच्या क्रमांकांसह अचूक ओळखत विश्वविक्रम रचला आहे. गौरीने घडवलेल्या विक्रमाची पद्धत :- एका टेबलावर 1 ते 53 असे क्रमांक टाकून ठेवण्यात आले. उपस्थित प्रेक्षकांकडून कोणत्याही वस्तू घेऊन त्या 1 ते 53 क्रमांकावर ठेवण्यात आल्या. या वस्तू ठेवताना गौरीला ही प्रक्रिया पाहण्याची संधी दिली गेली नाही. सर्व वस्तू ठेऊन झाल्यानंतर गौरीला त्यांचं अवलोकन करण्यासाठी फक्त एक मिनिटांचा वेळ देण्यात आला. त्यानंतर सर्व वस्तू उचलून एका टोपलीत ठेवण्यात आल्या आणि नंतर गौरीने सर्व वस्तू अचूकपणे त्यांच्या योग्य क्रमांकावर ठेवल्या. आधीचे विक्रमवीर नेपाळच्या अर्पण शर्मा यांनी एका मिनिटात 43 वस्तू योग्य जागी ठेवल्या होत्या. मात्र महाराष्ट्रातील या चिमुकलीने अफाट स्मरणशक्तीच्या बळावर 50 वस्तू अचूकपणे योग्य ठिकाणी ठेवल्या. लहानपणापासून हुशार असलेल्या गौरीने ही स्मरणशक्ती अथक प्रयत्नातून मिळवली आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून गौरीची आई वैशाली कोढे यांनी तिला विशेष तंत्र शिकवायला सुरुवात केली. गौरीच्या आई स्वामी विवेकानंद यांची पुस्तकं वाचायच्या. त्यांना स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्तेचं नेहमीच कौतुक वाटायचं. त्यांनी विवेकानंद यांच्या साहित्यावर संशोधन केलं आणि स्मरणशक्ती वाढवण्याचं तंत्र आत्मसात केलं. इतकंच नाही, तर मायलेकीने मिळून त्यांची एक वेगळीच डायमंड पद्धत विकसित केली. त्याच डायमंड पद्धतीच्या युक्त्या आणि सूत्रांचा वापर करुन वस्तू, शब्द, नावं, क्रमांक आणि भरपूर काही लक्षात ठेवता येतं. सोप्या शब्दात सांगायचं तर व्हिज्युअलायझेशन आणि इमॅजिनेशनच्या माध्यमातून सर्व काही दीर्घकाळ स्मरणात ठेवता येतं, असं वैशाली कोढे यांचं तंत्र आहे. गौरीला मोठेपणी आधी बिजनेसवुमन आणि त्यानंतर भारताची राष्ट्रपती व्हायचं आहे. ती आतापासूनच भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करत आहे. तिने या कोवळ्या वयात भारतीय राज्यघटनेचे बारकावे आत्मसात केले आहेत. तिला संपूर्ण घटना तोंडपाठ आहे. लवकरच गौरीला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचं सर्टिफिकेट प्राप्त होईल आणि नागपूरकर कन्येच्या नावावर जागतिक विक्रम कोरला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Karuna Sharma on Pankaja Munde and Dhananjay Munde: पंकजा अन् धनंजय मुंडेंनीच गलिच्छ राजकारण केलंय, दोघांनी राजकारणातून एक्झिट घ्यावी; करुणा शर्मांची कडाडून टीका
पंकजा अन् धनंजय मुंडेंनीच गलिच्छ राजकारण केलंय, दोघांनी राजकारणातून एक्झिट घ्यावी; करुणा शर्मांची कडाडून टीका
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Embed widget