एक्स्प्लोर

'भावाला खोटं बोलण्याचं नोबेल मिळेल', पंकजा मुंडेंची बोचरी टीका

उदगीर (लातूर): 'भावाच्या खोटं बोलण्यामुळे मी फार वैतागून गेली आहे. आमचे बंधू इतके खोटे बोलतात की, त्यांना खोटं बोलण्याचं नोबेल मिळेल' अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर बोचरी टीका केली.  त्या उदगीर येथील प्रचारसभेत बोलत होत्या. 'आजवर माझ्यावर अनेकदा टीका झाली. पण मी काही बोलले नाही, पण आता माझ्या लोकांनी मौन बाळगू नका उत्तर द्या, अशी शपथ घातलीय म्हणून मी बोलतेय. आमचे बंधू म्हणतात की, त्यांना मुंडेसाहेबांनी पक्षातून बाहेर काढलं. तर दोनच दिवसांनी अजित पवार म्हणतात की, राष्ट्रवादीत येण्यासाठी धनंजय मुंडे जवळपास दीड वर्षात फेऱ्या मारत होते. त्यामुळे आता नेमकं खोटं कोण बोलतंय? हे त्यांनीच जाहीर करावं.' असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचा खरपूस समाचार घेतला. pankaja-munde-compressed-1024x683 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उदगीर व जळकोट तालुक्यात पंकजा मुंडे यांनी काल सभा घेतल्या. धनंजय मुंडेंच्याच सांगण्यावरुन अजित पवार बोलले : पंकजा मुंडे काय आहे नेमकं प्रकरण: 'भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात होते. त्यांच्यासोबत पाशा पटेल, माधुरी मिसाळ, प्रकाश शेंडगे, पंकजा मुंडे असे चार-पाच आमदारही मुंडेंसोबत पक्ष सोडणार होते. मात्र मुंडे हे लोकसभेचे उपनेते होते, अशाप्रकारे पक्ष फोडायचा नसतो, असं मत व्यक्त करत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मुंडेंना पक्षात घेतलं नाही.' असा धक्कादाय खुलासा अजित पवारांनी माझा कट्टावर केला होता. 'पक्ष सोडण्याची संपूर्ण तयारी झाली होती. त्यावेळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी समजूत घातली आणि मुंडेंनी निर्णय बदलला, असा दावा अजित पवारांनी केला. मुंडेंसोबत इतर आमदार जाऊ नयेत, यासाठी देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यासारखे भाजप नेते प्रयत्नशील होते, असंही त्यांनी सांगितलं होतं. माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या काळात भाजप आतासारखी नव्हती, असं मतही अजित पवारांनी व्यक्त केलं होतं.' 'आमदार धनंजय मुंडे यांचे पिता पंडित अण्णा मुंडे यांनी भेट घेतली होती. त्यावेळी काही घटना घडतात, गोपीनाथ मुंडेंना सोडू नका, असा सल्ला मीच धनंजय मुंडेंना दिला होता. असंही अजित पवार म्हणाले. मात्र वर्षभरानंतर त्यांनी पुन्हा माझी भेट घेतली. आपल्याला त्या पक्षात (भाजप) राहायचंच नाही, राष्ट्रवादीत प्रवेश मिळणार नसेल, तर आपल्यासाठी इतर पक्षांची दारं उघडी आहेत, असं धनंजय मुंडेंनी सांगितल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.' असंही अजित पवार म्हणाले होते. Ajit-Pawar-Katta-580x395 मनमोहन सिंहांनी मुंडेंना काँग्रेसमध्ये घेतलं नाही, अजित पवारांचा गौप्यस्फोट पवारांना पाहून मुंडेंनी वाढदिवस ठरवला : अजित पवार गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचाही वाढदिवस 12 डिसेंबरला असल्याचा सार्वत्रिक समज आहे. मात्र तपशील काढून पाहिल्यास मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचं समजेल, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘माझा कट्टा’वर केला होता. ही माहिती खुद्द गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं. 'पवारांच्या घरी संस्काराची कमी' “मी नेहमी शरद पवार यांचा आदर, सन्मान केला आहे. हा माझ्या संस्काराचा भाग आहे. पण अजित पवार यांच्या वक्तव्यावरुन पवारांच्या घरात संस्काराची कमी असल्याचं दिसतं.” तसंच गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल माझ्याशी कधीच चर्चा केली नाही. आमदार असताना मी त्यांच्यासोबत दिल्लीलाही गेले नाही, असा दावाही पंकजा यांनी केला आहे. “गोपीनाथ मुंडेंनी जन्म तारीख बदलल्याचा आरोप धादांत खोटा” dhananjay-munde-1-580x395 मुंडे साहेबांची साथ सोडण्याची माझी इच्छा नव्हती: धनंजय मुंडे ‘मुंडे साहेबांची साथ सोडण्याची माझी इच्छा नव्हती. भाजपमध्ये मी कार्यकर्ता म्हणून 10 वर्ष काम केलं होतं, त्यामुळे माझं नेतृत्व लादलेलं नाही.  पंकजा, प्रीतम मुंडे यांचं नेतृत्व लादलेलं आहे की नाही याबाबत मात्र, मी काहीही बोलणार नाही. विधानसभा निवडणुकीत माझा अवघ्या 20 हजार मतांनी पराभव झाला. याला मी काही पराभव मानत नाही.’ असं धनंजय मुंडे यांनी माझा कट्टावर सांगितलं होतं. संबंधित बातम्या: दुर्दैवानं, पंकजा मुंडेंसोबत काही नातं राहिलं नाही: धनंजय मुंडे पवारांच्या घरात संस्काराची कमी : पंकजा मुंडे

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates:सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
CBSE 10th Board Result 2026: प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
Aaditya Thackeray: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात हायअलर्ट, पुढील पाच दिवस कसे?
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात हायअलर्ट, पुढील पाच दिवस कसे?

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump: 'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Embed widget