MVA Seat Sharing In Maharashtra : वाद मिटेना, जागावाटपाचा तिढा सुटेना अन् बैठकांचा जोर सुरुच; आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक!
MVA Seat Sharing In Maharashtra : सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी थेट दिल्लीपर्यंत धडक दिल्याने सुद्धा महाविकास आघाडीमध्ये तणाव चांगलाच वाढला आहे.
MVA Seat Sharing In Maharashtra : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीमधील (MVA Seat Sharing In Maharashtra) जागावाटपातील वाद तसेच काही जागांवरील दावेदारी सुरुच असल्याने बैठकांचा सिलसिला सुद्धा सुरूच आहे. आज (28 मार्च) पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील मातब्बर नेत्यांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या जागेवरती चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्येच या तिन्ही जागांवर अंतिम फैसला केला जाईल, अशी चर्चा आहे.
जागा वाटपाचा तिढा सुटणार की नाही?
या बैठकीसाठी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण हे असणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत सुद्धा उपस्थित असणार आहेत, तर शरद पवार गटाकडून स्वतः शरद पवार उपस्थित असतील. या बैठकीमध्ये तरी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार की नाही याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून 17 उमेदवार जाहीर करण्यात आल्यानंतर काँग्रेसमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्यामुळे धुसपूस सुरु झाल्याची चर्चा आहे. यामध्ये प्रामुख्याने सांगली, भिवंडी, दक्षिण मुद्दे मुंबई जागेचा समावेश आहे. या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांचा दावा आहे. ठाकरेंकडून सांगलीमध्ये आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये उमेदवार जाहीर करण्यात आल्याने काँग्रेस नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. दुसरीकडे सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी थेट दिल्लीपर्यंत धडक दिल्याने सुद्धा महाविकास आघाडीमध्ये तणाव चांगलाच वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आजची होणारी बैठक महाविकास आघाडीची थोडी वादळी होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रामध्ये संयुक्त सभा घेण्यासाठी रणनीती
दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रामध्ये संयुक्त सभा घेण्यासाठी सुद्धा रणनीती आखली जात आहे. यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून संयुक्त सभा होणार आहेत. त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापणार आहे. महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून त्यानुसार या सभांचे नियोजन केले जाईल. महाविकास आघाडीची एकसंधपणा आणि ताकद दिसावी तसेच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये ज्या ठिकाणी नाराजी असेल त्या ठिकाणी नाराजी दूर व्हावी व उमेदवाराला एक प्रकारे ताकद मिळावी या दृष्टिकोनातून या संयुक्त सभांचे नियोजन महाविकास आघाडीकडून केलं जात आहे.
रामटेकमध्ये काँग्रेस अडचणीत
दुसरीकडे काँग्रेसची जागांवरून चर्चा सुरू असतानाच विदर्भातील रामटेकमध्ये जाहीर केलेल्या उमेदवार रश्मी बर्वे यांटी उमेदवारी रद्द होण्याची टांगती तलवार आहे. रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र आणि जात हे दोन्ही रद्द करण्यात आल्याने तगडा झटका बसला आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर टांगटी तलवार आहे. दुसरीकडे त्यांचे पती शामकुमार बर्वे यांच्या सुद्धा उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. रश्मी बर्वे यांनी जोडलेल्या एबी फॉर्मवरती शामकुमार बर्वे यांचं नाव पाचव्या क्रमांकावर असल्याने त्यांच्या उमेदवारीवरती आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या