संतापजनक! सांगलीत 13 दिवसांच्या बाळाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या
सांगलीत 13 दिवसांच्या बाळाी घराच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीत बुडवून ही हत्या करण्यात आली आहे. हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
![संतापजनक! सांगलीत 13 दिवसांच्या बाळाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या Murder of a 13-day-old baby by drowning in a water tank in sangli संतापजनक! सांगलीत 13 दिवसांच्या बाळाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/05011214/WEB-SANGLI-CHILD-DEATH.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली : अवघ्या 13 दिवसांच्या बाळाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सांगलीतील पलूस तालुक्यातील माळवाडी येथील पाटील मळा येथे ही घटना घडली आहे. घराच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीत बुडवून ही हत्या करण्यात आली आहे. मात्र हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
माळवाडी -वसगडे रस्त्यालगत माळी यांचा शेतातील वस्तीवर साईदीप नावाचा बंगला आहे. सकाळी घरातील सर्वजण शेतातील कामासाठी गेले होते. त्यांची मुलगी ऐश्वर्या अमित माळी ही 13 दिवसाच्या बाळासोबत बेडरूममध्ये झोपली होती. तिची आई व वहिनी या दोघी शेतातील हौदावर धुणे धुत होत्या. ऐश्वर्या घराबाहेर असणाऱ्या बाथरूममध्ये गेली, त्यावेळी बेडरुम खाटेवर बाळ झोपलं होतं. मात्र ती परत घरातील बेडरूममध्ये आली, तेव्हा खाटेवरून बाळ गायब झाल्याचे लक्षात आले.
बाळ सापडत नसल्याने तिने सर्वांना बोलावलं आणि हा प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यानंतर सर्व आल्यानंतर बाळाचा सगळीकडे शोध घेण्यात आला. काही नागरिकांना शंका आली म्हणून बंगल्याच्या गच्चीवर असणाऱ्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडले असता पाण्याच्या टाकीत बाळाचा मृतदेह तरंगत असल्याचा दिसून आला. याबाबत भिलवडी पोलीस ठाण्यात वर्दी देण्यात आली आहे.
भिलवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तासगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी आश्विनी शेंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून पोलिसांना तपास कामी योग्य त्या सूचना दिल्या. भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. पोलिसांनी सर्व कुटुंबीय व शेजाऱ्यांकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे.
TOP 50 | संध्याकाळच्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 04 नोव्हेंबर 2020
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)