एक्स्प्लोर

महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीचे निकाल

महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची जास्त अधिक नसली तरी, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांचा निकाल जनमताचा प्रथमिक कल म्हणून महत्त्वाचा मानला जात आहे.

मुंबई : राज्यात विविध महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची जास्त अधिक नसली तरी, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांचा निकाल जनमताचा प्रथमिक कल म्हणून महत्त्वाचा मानला जात आहे. परभणी (महापालिका, नगरपरिषद नगराध्यक्षपद) परभणी महानगरपालिकेतील दोन, सोनपेठ नगरपरिषदेतील एक आणि मानवत नगराध्यक्षपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. ज्यात परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, सोनपेठमध्ये काँग्रेस, मानवतमध्ये भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं. परभणी महापालिकेतील प्रभाग क्र 3 चे शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडे यांचे निधन झाले होते. तर प्रभाग क्र 11 मधील काँग्रेसचे नईमोद्दीन यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने या दोन्ही जागांसाठी काल पोटनिवडणूक झाली. ज्यात वार्ड क्रमांक 11 मध्ये एमआयएमच्या अब्दुल फातेमा अब्दुल जावेद तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गवळणबाई रोडे विजयी झाल्या आहे. तसंच मानवत नगरपालिकेतील शिवसेनेच्या अध्यक्ष शिवकन्या स्वामी यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने इथेही पोटनिवडणूक झाली होती. ज्यात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार प्रा. एस एन पाटील यांनी विजय मिळवला. तर सोनपेठ नगरपरिषदमधील प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका कांताबाई कांदे यांचं निधन झाल्याने रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार लक्ष्मण खरात यांचा विजय झाला. पुणे (महापालिका, जिल्हा परिषद) पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 अ मध्ये 7, प्रभाग क्रमांक 42 अ मध्ये 4 आणि ब मध्ये 3 या जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. पुणे महापालिकेच्या कळस धानोरी प्रभाग क्रमांक 1 मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या ऐश्वर्या जाधव तीन हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपच्या किरण जठार यांचं नगरसेवकपद रद्द झाल्याने या प्रभागात पोटनिवडणूक झाली होती. भाजपने ही जागा स्वत:कडे कायम राखली. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक 42 लोहगाव-फुरसुंगीमध्ये नगरसेवकपदाच्या दोन जागांसाठी काल निवडणूक झाली होती. या निवडणुकीत एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने तर एक भाजपने जिंकली आहे. प्रभाग क्रमांक 42 अ जागेसाठी झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे गणेश ढोरे चार हजार मतांनी जिंकले आहेत. प्रभाग क्रमांक 42 ब मध्ये भाजपच्या अश्विनी पोकळे 932 मतांनी विजय मिळवला. तर इंदापूरच्या बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा बहुमताने विजय झाला आहे. अंकिता पाटील 17 हजार 274 मतांनी विजयी झाल्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या जागेवर 23 जून रोजी मतदान झालं होतं. चंद्रपूर (महापालिका) चंद्रपूर महापालिकेच्या दोन जागांसाठीच्या पोटनिवडणूक निकालात काँग्रेस-भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. जात प्रमाणपत्र सादर करु न शकल्याने बसपा नगरसेवक अपात्र ठरल्याने इथे पोटनिवडणूक झाली होती. यासाठी काल (23 जून) 28 टक्केच मतदान झालं होतं. प्रभाग क्रमांक 6 मध्ये काँग्रेसच्या कलावती यादव यांचा विजय झाला. तर प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपच्या प्रदीप किरमे यांनी विजय मिळवला. चंद्रपूर मनपात भाजपची निर्विवाद सत्ता आहे, त्यात आता आणखी एका जागेची भर पडली आहे. मूल नगरपरिषद पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. काँग्रेस उमेदवार ललिता फुलझेले यांनी भाजप उमेदवार शिल्पा रामटेके यांचा 176 मतांनी पराभव केला आहे. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये भाजप नगरसेवक अपात्र ठरल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली होती. मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदासंघात काँग्रेसच्या विजयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. अहमदनगर (नगरपरिषद) संगमनेर नगरपालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे. राजेंद्र वाकचौरे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा  711 मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेनेच्या नगरसेवकाचं जातप्रमाण पत्र अवैध ठरल्याने इथे पोटनिवडणूक झाली होती. नाशिक (महापालिका) मालेगाव महापालिकेच्या प्रभाग 6 क मधील पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे. महिला राखीव असलेल्या या जागेवर काँग्रेस आणि जनता दल अशी सरळ लढत होती. काँग्रेसच्या पहमिदा कीरदौस मो.पारुक आणि जनता दलाच्या खान शकीला बेगम अमानुतुल्ल्ला या रिंगणात होत्या. जळगाव (पंचायत समिती, ग्रामपंचायत) मेहुणबारे पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत पुन्हा भाजपचा विजय झाला आहे. भाजपच्या सुनंदा साळुंखे यांनी राष्ट्रवादीच्या जयश्री साळुंखे यांना पराभूत केलं. या पोटनिवडणुकीमुळे पंचायत समितीमधील पक्षीय बलाबल समान झालं आहे. मेहुणबारे गणाच्या भाजपाच्या सदस्या रुपाली साळुंखे यांच्या निधनानंतर दहा महिन्यांनी पोटनिवडणूक झाली. हिंगोणे ग्राम पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत प्रमिलाबाई सुरेश पाटील यांचा विजय झाला आहे. प्रमिलाबाई यांनी सुनील कोष्टी यांचा अवघ्या सहा मतांनी पराभव केला. प्रमिलाबाई यांना 133 तर सुनील कोष्टी यांना 127 मतं मिळाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget