एक्स्प्लोर

लातूर, चंद्रपूर, परभणीत महापालिकेसाठी सरासरी 62 % मतदान

लातूर : चंद्रपूर, परभणी व लातूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 62 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन या तिन्ही ठिकाणी सायंकाळी 5.30 ऐवजी 6.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली होती. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी 57 टक्के, परभणी महानगरपालिकेसाठी 70 टक्के; तर लातूर महानगरपालिकेसाठी 60 टक्के मतदान झाले. त्याचबरोबर अकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर निवडणूक विभागाच्या पोटनिवडणुकीसाठी 47.97 टक्के; तर अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या पोटनिवडणुकीसाठी 50.18 टक्के मतदान झाले. अशी माहिती सहारिया यांनी दिली आहे. चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान झालं आहे. 201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तीनही महापालिकांसाठीची मतमोजणी शुक्रवारी 21 एप्रिल रोजी होणार आहे. दुपारी 3.30 वाजेपर्यंत चंद्रपूर महापालिकेत 36.27, परभणीत 44.58 आणि लातूरमध्ये 39.50 टक्के मतदान नोंदवलं गेलं. तीनही महापालिकांमध्ये सरासरी 39.93 टक्के मतदान झालं आहे. मतदानाची टक्केवारी : दुपारी 3.30 पर्यंतची आकडेवारी लातूर- 39.50 परभणी- 44.58 चंद्रपूर- 36.27 सरासरी- 39.93 चंद्रपूर- 36.27 % दुपारी 1.30 वाजेपर्यंतची आकडेवारी चंद्रपूर - 27 टक्के -- सकाळी 11.30 पर्यंतची आकडेवारी चंद्रपूर- 19.20 टक्के मतदान परभणी- 25 टक्के मतदान लातूर- 23 टक्के मतदान पहिल्या दोन तासात चंद्रपूरमध्ये 9 टक्के, लातूरमध्ये 8 टक्के तर परभणीत 12.5 टक्के मतदान झालं आहे. एकूण 7 लाख 92 हजार 720 मतदारांसाठी 1 हजार 19 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्र आदर्शवत करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. तसेच विदर्भातील वाढलेल्या तापमानामुळे मतदानाची वेळ 1 तासाने वाढवण्यात आली आहे. लातूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 70
  • राष्ट्रवादी काँग्रेस- 13
  • काँग्रेस- 49
  • शिवसेना- 06
  • रिपाइं- 02
  परभणी महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 65
  • राष्ट्रवादी काँग्रेस- 30
  • काँग्रेस- 23
  • शिवसेना- 8
  • भाजप- 2
  • अपक्ष- 2
  चंद्रपूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 66
  • काँग्रेस- 26
  • भाजप- 18
  • शिवसेना- 5
  • राष्ट्रवादी- 4
  • मनसे- 1
  • बीएसपी-1
  • अपक्ष- 10
  • भारिप बहुजन महासंघ- 1
  तिन्ही महापालिकेत एकूण 125 उमेदवार कोट्यधीश असल्याचं समोर आलं आहे. तर 64 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. विशेष म्हणजे, 1 हजार 284 उमेदवारांपैकी एकूण 806 उमेदवार अल्पशिक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी भाजपाने 44, काँग्रेसने 31, राष्ट्रवादी काँग्रेसने 19, शिवसेनेने 15 कोट्यधीश आणि लखपतींना उमेदवारी दिली आहे. या सर्व उमेदवारांची मिळून सरासरी संपत्ती काढली, तर प्रत्येकजण 50 लाखांच्या संपत्तीचा मालक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांमध्ये 64 उमेदवारांविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, विनयभंग, दरोडा आणि जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत.  यातील सर्वाधिक गुन्हे हे लातूरच्या वार्ड क्रमांक 7 मधील रिपाइंचे उमेदवार चंद्रकांत चिट्टेवर यांच्याविरोधात आहेत. चिट्टेवर यांच्याविरोधात एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारांना तिकीट वाटपात या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. कारण, काँग्रेसचे 24, भाजपचे 18, शिवसेनेचे 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 उमेदवार गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत. फेब्रुवारी महिन्यात मुंबई, पुण्यासह दहा महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं होतं. त्यामुळे चंद्रपूर, परभणी आणि लातूर महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
Embed widget