एक्स्प्लोर
मुंबईचा दूध पुरवठा बंद होणार नाही, आमचेही कार्यकर्ते मैदानात : जानकर
काहीही झालं तरी मुंबईचा दूध पुरवठा कमी होऊ देणार नाही, आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत, असं पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.
नाशिक : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन पुकारलं आहे. मात्र काहीही झालं तरी मुंबईचा दूध पुरवठा कमी होऊ देणार नाही, आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत, असं पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.
मागणी मान्य न झाल्यास राजू शेट्टी यांनी रविवारी रात्रीपासूनच मुंबईचा दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. नाशिकमध्ये बोलताना महादेव जानकर यांनी दूध उत्पादकांना संरक्षण देणार असल्याचंही सांगितलं आणि न घाबरता दूध पुरवठ्याचं आवाहन केलं.
ज्यांना आंदोलन करण्याची इच्छाच आहे, त्यांच्याबद्दल आम्ही काही सांगू नाही शकत. पण मुंबईला दूध पुरवठा कमी होणार नाही, संरक्षण दिलं जाईल, आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत. दूध उत्पादकांनी न घाबरता दूध पुरवठा करावा, तुम्हाला पोलीस संरक्षण दिलं जाईल, असं महादेव जानकर यांनी सांगितलं.
दुधाला 20 तारखेपासून 3 रुपये दरवाढ केली जाणार आहे आणि जीएसटी कमी झाल्यास 2 रुपये होणार कमी आहेत, असे एकूण 5 रुपये दरवाढ केलीच आहे, असा दावा जानकर यांनी केला.
शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य दर दिला पाहिजे अशी नोटीस काल रात्रीच सर्व दूध संघाना पाठवली आहे. तसं न केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा महादेव जानकर यांनी दिला.
दरम्यान, दूध रस्त्यावर ओतणं हे बरोबर नाही. आपण शेतकऱ्यांची पोरं आहोत, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. साखरेसारखी दुधाची अवस्था झाली असल्याचं जानकरांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement