एक्स्प्लोर

मुंबईचा गेम चेंजर '22 सूत्री' कार्यक्रम देशासमोर आदर्श

नेहमीच गतीमान असणाऱ्या मुंबईनं कोरोना व्हायरसला मागे टाकण्यासाठीही तेवढ्याच वेगानं पावलं उचलली. त्यामुळेच आज मुंबईचा रिकव्हरी रेटम्हणजेच रुग्ण बरे होण्याचा दर हा 70 टक्के आहे.

मुंबई : देशातलं आणि राज्यातलं कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखलं जाणारं शहर म्हणजे मुंबई. एक वेळ अशी होती जेव्हा मुंबईला कोरोनाचा नरक संबोधलं गेलं. मात्र, त्याच मुंबईत कोरोनाचा वेग कमी करण्यात प्रशासनाला यश आलं आहे. या यशामागे आहे मुंबई महापालिका आयुक्तांनी राबवलेली एक गेम चेंजर पॉलिसी...आता मुंबईनं राबवलेला 22 सुत्री धोरणांचा हाच मुंबई पॅटर्न देशभरात लागू करण्याचा सल्ला केंद्रीय पथकानं दिला आहे. मुंबईचं 22 सूत्र असणारं हे धोरण गेम चेंजर ठरलंय.

मुंबईचा 22 सूत्री कार्यक्रम देशासमोर आदर्श

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची 22 सूत्री कार्यक्रमाची पुस्तिका केंद्राला सादर केली आहे. सोबतच, मुंबईचा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी 22 सूत्री कार्यक्रम देशभरातील हॉटस्पॉटमध्ये राबवण्याचा केंद्रीय पथकाचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रातही पुणे, ठाणे सारख्या हॉटस्पॉटमध्ये राबवला जाऊ शकतो. हा मुंबईचा 22 सूत्री कार्यक्रम देशासमोर आदर्श आहे.

तीन महिन्यापूर्वी धारावी, वरळी ही नावं घेतली तरी धडकी भरायची. कोरोनानं मुंबईत प्रचंड वेगानं आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. कोरोनाच्या आक्रमणानंतर काही काळ आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि सर्वसामन्य जनताही भांबावलेल्या अवस्थेत होते. मात्र, कोरोनाला रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचं सुसूत्रीकरण गरजेचं होतं. 8 मे ला मुंबई महापालिकेवर नव्या आयुक्तांची नेमणूक करण्यात आली. आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पदभार घेताच कोरोनाचा कल समजून घेत आक्रमकरित्या वेगवेगळ्या धोरणाची अंमलबजावणी सुरु केली. यातूनच तयार झाली 22 सूत्री कार्यक्रमाची गेम चेंजर पॉलिसी...

मुंबईतला गेम चेंजर ठरलेला 22 सूत्री कार्यक्रम नेमका कसा तयार केला?

ही 22 सूत्रं एका दिवसात तयार झाली नाहीत. कोरोनाचा कल समजून टप्प्या टप्प्यात ही धोरणं तयार झाली. यात मुंबईतल्या दाटीवाटीच्या वस्त्या, उच्चचभ्रू परिसरातला कोरोनाचा फैलाव, रुग्ण खाटांचं नियोजन, आरोग्य यंत्रणेचं सक्षमीकरण असे वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न झाले. मात्र, मुंबईनं परिस्थिती लक्षात घेऊन राबवलेली ही धोरणं जशीच्या तशी देशातील इतर हॉटस्पॉटच्या ठिकाणी लागू केली तरी कोरोनाचा वेग नियंत्रीत करता येऊ शकतो असं केंद्रीय पथकानं म्हटलं आहे.

याच 22 सूत्री कार्ययक्रमाच्या आधारे पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉटमध्ये पावलं उचलण्याच्या सूचना उपमुख्ययमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत .

काय आहे मुंबईचा गेम चेंजर 22 सूत्री कार्यक्रम

  1. चेस द व्हायरस पॉलिसी  : हाय रिस्क कॉन्टॅक्टला क्वारंटाईन करण्याचा वेग वाढवला. यामुळे मे महिन्यात 8 दिवसांचा असणारा डबलींग रेट 52 दिवसांवर पोहोचला. तर , 8.6% चा रुग्ण संख्या वाढीचा दर 1.34% वर आला.
  2. चेस द पेशंट पॉलिसी : 24*7 चालणा-या वॉर्डनिहाय वॉररुम तयार केल्या. यामुळे रुग्णांना कोव्हिड चाचणीचा अहवाल कळणे आणि उपचाराची प्रक्रीया सोपी झाली. वॉर रुममार्फत रुग्णणखाटांची विकेंद्रीत प्रणाली तयार करण्यात आली. दररोज मध्यरात्री 12 वाजेपर्यंत कोरोनाबाधित पेशंटचा अहवाल महापालिकेला कळवणे खाजगी लॅबसाठी बंधनकारक केले. यामुळे खाजगी लॅबचे अहवाल वेगानं प्राप्त झाले.
  3. 35 खाजगी हॉस्पिटलमधील सेवा शासकीय यंत्रणेनं ताब्यात घेऊन सरकारी हॉस्पिटलच्या दरात खाजगी हॉस्पिटलचे बेड उपलब्ध करुन दिले. (देशातील पहिले शहर)
  4. उबेर अॅपच्या धर्तीवर अॅम्ब्युलन्स सेवा -626 अॅम्ब्युलन्स महापालिकेनं उपलब्ध करुन दिल्या.
  5. कोविड पेशंटसाठी डायलिसीस मॅनेजमेंटसाठीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म
  6. कोविड रुग्णांसाठी विशेष तातडीच्या आरोग्य यंत्रणेची उभारणी
  7.  मोकळ्या मैदानांवर जम्बो फिल्ड हॉस्पिटल्सची उभारणी (भारतातले पहिले शहर)
  8. कोविड रुग्णांसाठी "वॉक इन फॅसिलीटी"
  9. आयसीयु बेडस् मध्ये वाढ- 5 जूलै पर्यंत 1681 आयसियु बेडस् उपलब्ध
  10. . स्मशानभूमी व्यवस्थापनासाठी डॅशबोर्ड सुविधा
  11. युनिव्हर्सल टेस्टींग पॉलिसी - आयसीएमआरच्या गाईडलाईन पलीकडे जात मुंबईनं सरसकट कोरोना चाचणी कार्यक्रम 23 जून पासून राबवायला सुरुवात केली.
  12. मिशन धारावी - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीतील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी धारावीकरता वेगळ्या मिशनची आखणी आणि अंमलबजावणी
  13. मोठ्या राज्यशासनाच्या आणि महापालिकेच्या हॉस्पिटलवर लक्ष ठेवण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांच्या नेमणूका
  14. महापालिकेच्या अखत्यारित्या येणा-या इतर महत्वाच्या 35 हॉस्पिटलवर लक्ष ठेवण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांच्या नेमणूका
  15. कोविड परिस्थितीसाठी विशेष तातडीच्या मनुष्यबळाची आणि डॉक्टर, नर्सेस, इतर वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या स्टाफची उभारणी
  16.  मिशन झिरो - रॅपिड अॅक्शन प्लानची 22 जून पासून सुरुवात
  17. बेस्ट आणि महापालिका कर्मचाऱ्यांनाही फ्रंटलाईन वर्कर्स प्रमाणेच 50 लाखांचा विमा
  18.  कंटेन्मेंट झोनमध्ये स्वयंसेवी कोरोना वॉरियर्सच्या नेमणूका/ मेडिकल कॅम्पचे कम्युनिटी लिडर्सकडून व्यवस्थापन
  19. स्पेशल टास्क फोर्सच्या सूचना/मार्गदर्शन
  20.  केईएम, नायर रुणालयांमध्ये यशस्वी प्लाझ्मा थेरपी
  21.  मुंबईचा हंगर मॅप : स्वयंसेवी संघटनांच्या मदतीनं मिलकर नावाचा प्लॅटफॉर्म ज्यातून स्थलांतरितांसाठी फुड पॅकेटस् आणि कंटेंटमेंट झोनमध्ये रेशन वाटले गेले.
  22. फिवर क्लिनीक : 424 फिव्हर क्लिनीक मधून स्वयंसेवी संघटनांच्या मदतीनं 78 लाख लोकांचं स्क्रिनींग करण्यात आले. 3.25 लाख वरिष्ठ नागरिकांची ऑक्सिजन पातळीची तपासणी केली

कोरोनाशी लढण्याचं हे 22 सूत्रांचं शस्त्र मुंबईला अचानक गवसलेलं नाही. मुंबईला अनुभवातून आलेलं हे शहाणपण आहे. योग्य नियोजन, यंत्रणांचं सुसूत्रीकरण, धोरणांची तत्पर अंमलबजावणी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धोरणं राबवणाऱ्या हातांची आणि समाजाची सकारात्मकता असेल तर कोरोनाचं काय कोणतंही संकट आपल्यापुढे गुडघे टेकू शकतं. मुंबईला गवसलेलं हे सूत्र म्हणूनच मुंबई पॅटर्नच्या रुपानं देशासमोर नावाजलं जातंय.

संबंधित बातम्या :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget