एक्स्प्लोर

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उघड केला डांबर घोटाळा, मंत्र्यांच्या वरदहस्ताने शेकडो कोटी उकळल्याचा आरोप

सरकारमधील लोकांनी रस्त्यावर वापरल्या जाणाऱ्या डांबरामध्ये भ्रष्टाचार करुन सरकारचे तोंड काळे केले आहे. विधानसभेत जयंत पाटील यांचे गंभीर आरोप..

Mumbai: राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज विधानसभेत पुरवणी मागणीच्या चर्चेदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागातील डांबर घोटाळा उघडकीस आणला. सरकारमधील मंत्र्याच्या वरदहस्ताने डांबराच्या बिलातून शेकडो कोटी रुपये उकळले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील आर.डी. सामंत कन्स्ट्रक्शन ही कंपनी अनेक शासकीय कामांचे कंत्राट घेते. आपल्या सरकारमधील एका मंत्र्यांचे (पालकमंत्री उदय सामंत) सगेसोयरे या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. या मंत्र्यांच्या वरदहस्तामुळे या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, नॅशनल हायवे इत्यादी विभागांमध्ये कामे घेऊन प्रचंड मोठा घोटाळा केला असल्याचे आरोप यावेळी त्यांनी केले.

यावेळी या कंपनीने केलेल्या कारभाराची 3 उदाहरणं देत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अशा प्रकारचे शेकडो कोटींचे अनेक भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. या प्रकरणात अनेक अधिकारीही सामील असून तेही या भ्रष्टाचारास तितकेच जबाबदार आहेत असेही ते म्हणाले.

डांबर बिल वापरून पैसे काढण्याचे काम

या संबंधित कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रत्नागिरी येथील रहिवास रेड्डी रोडचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम केले.या कामासाठी वापरलेल्या डांबराच्या बिलाचा नंबर आणि रत्नागिरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ऍप्रोच रोड ते जॅकवेल पर्यंत जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे नूतनीकरण करण्याच्या कामासाठी वापरलेल्या डांबराच्या बिलाचा एकच नंबर ( बिलाचा नंबर - बीपीसीएल 4582111044 ) आहे. म्हणजेच या दोन्ही कामांसाठी एकच डांबर बिल वापरून पैसे काढण्याचे काम झाल्याचे ते म्हणाले.

पुर्नडांबरीकरण करताना एकच बील वापरून काढले पैसे

नेवरे भांडारपूळे रोड या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या रस्ता रुंदीकरण आणि ब्लॅक टॉपींग कामासाठी वापरलेल्या डांबराचे पावती क्रमांक BPCL 4582165210 हा आणि MIDC अंतर्गत रत्नागिरी पाणी पुरवठा योजना अंतर्गत हार्चेरी जॅकवेल पर्यंत जाणारा ॲप्रोच रस्ता पुर्नडांबरीकरणाचे केलेले कामाचे डांबराच्या बिलाचा नंबर देखील सारखाच आहे. म्हणजेच  या दोन्ही कामासाठी देखील एकच डांबर बील वापरून पैसे काढण्याचे काम झाले आहे.

कसा झाला घोटाळा?

एप्रिल 2023 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर रत्नागिरी अंतर्गत उपविभाग क्रमांक 1 यांनी निवळी जयगड या रस्ता कामासाठी वापरुन संपवलेली डांबराची बिले ऑगस्ट 2023 मध्ये ..

  1. Rehabilitation & Upgradation of NH-66 (Old NH-17) कांटे ते वालकेड
  2. Rehabilitation & Upgradation of NH-66 (Old NH-17) अरावली ते कांटे या दोन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामांसाठी दाखवून 8 कोटी 52 लाख 53 हजार 641 रुपये उकळले आहेत.

बिलात घोटाळा करत संगनमताने अपहार

यात महत्वाची बाब म्हणजे टेंडर मधील अटी व शर्तीनुसार ज्यावेळी अभियंता डांबराचा वापर दाखवतो त्यावेळी ठेकेदाराने दिलेल्या ओरीजनल बिलावर क्रॉस करुन कार्यालयाचा सही शिक्का मारुन त्याची झेरॉक्स ठेकेदाराला इतर लेखा ठेवण्यासाठी परत द्यावयाची असते. ज्यावेळी डांबराची बिले एप्रिल २०२३ मध्ये उपअभियंता सा.बां. उप विभाग क्र.१ यांनी वापरली त्यावेळी बिल क्रॉस न करता ओरिजनल डांबराची बिले ठेकेदाराला परत केल्याने तीच बिले ठेकेदाराने दुसऱ्या कामासाठी म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर वापरुन, न केलेल्या कामाच्या बिलाची रक्कम घेतलेल्या आहेत. या सर्व कामामध्ये संगमताने साडे आठ कोटी पेक्षा जास्त रक्कमेचा अपहार झालेला आहे असे जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितले.

सरकारमधील लोकांनी रस्त्यावर वापरल्या जाणाऱ्या डांबरामध्ये भ्रष्टाचार करुन सरकारचे तोंड काळे केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. या कंपनीने केलेल्या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी. तसेच, आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कंपनीवर व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी करण्याचे निर्देश द्यावे. अशी मागणी त्यांनी केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report
Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget