एक्स्प्लोर

Sudhir Joshi Profile : शिवसेनेचा पहिल्या फळीतील मोहरा, बाळासाहेबांचा सच्चा शिलेदार, कोण होते सुधीर जोशी?

शिवसेनेचे जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं आहे. शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये सुधीर जोशी यांचा मोठा वाटा होता.

Sudhir Joshi Profile : 'संस्कृत तसंच सुशिक्षित कार्यकर्त्यांचे मोहोळ लाभलेले' आणि लोभस व्यक्तिमत्त्व असलेले, एकमेव शिवसेना नेता म्हणजे सुधीरभाऊ जोशी होय. सुधीर जोशी यांच नुकतंच मुंबई येथे निधन झालं आहे. ते 81 वर्षांचे होते. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते असणारे सुधीर जोशी यांनी मुंबईचं महापौरपदही भूषवलं होतं. तरुण आणि तडफदार अशा सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा त्यामुळेच बाळासाहेबांनी सोपविली होती. सुधीर यांनीही ती समर्थपणे सांभाळली. बाळासाहेबांनी त्यांच्यावरील टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला. बाळासाहेबांच्या सहकारी नेत्यांतील एक विश्वासू सहकारी नेता म्हणून ते बाळासाहेबांचे कायमच जवळचे सहकारी राहिले आहेत.

सुधीर जोशींच्या राजकीय प्रवासावर एक नजर

  • सुधीर जोशी हे 1968 साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. 1973 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते. 
  • 1968 पासून ते विधान परिषद सदस्य होते. 1992-93 या दरम्यान ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करून त्यासंदर्भात अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे शासनाकडे सादर केला.
  • शिवशाही सरकारामध्येही ते जून 1995 ते मे 1996 या कालखंडात प्रथम महसूल मंत्री होते.
  • त्यानंतर 1996 ते 1999 पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय कायमच लोकाभिमुख ठरले आहेत.

लोकाधिकार समिती म्हणजेच सुधीर जोशी

स्वतःच्या नेतृत्वाचे उसने अवसान न आणता त्यांनी लोकाधिकार चळवळीला बळ दिले.  या चळवळीने जे बळ धरले आणि यश प्राप्त केले, त्यात सुधीर जोशींचा सिंहाचा वाटा आहे. संगीत, क्रिकेट आणि समाजसेवा यांचा त्रिवेणी संगम सुधीरभाऊंच्या जीवनात पाहायला मिळतो. ते त्यांच्या 'आपुलकी' या मोठ्या गुणामुळे गुणीजनांत आणि समाजात अतिशय आपलेसे झाले होते. त्यामुळेच स्थानीय लोकाधिकार समिती म्हणजेच सुधीर जोशी हे समीकरण पक्के झालं आणि वृद्धिंगतही झालं. 

सुधीर जोशींनी भूषवलेली काही खास पदे

  • अध्यक्ष- शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष
  • अध्यक्ष / विश्वस्त - साने गुरुजी विद्यालय, दादर सार्वजनिक वाचनालय
  • कार्यकारी समिती सदस्य - गरवारे क्लब.
  • सल्लागार-जसलोक रुग्णालय कर्मचारी संघटना.
  • विश्वस्त-जाणीव प्रतिष्ठान.
  • विश्वस्त-शिवाई सेवा ट्रस्ट.
  • अध्यक्ष-बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना.
  • अध्यक्ष - इंडियन ओव्हरसीज बँक कर्मचारी सेना
  • अध्यक्ष-कॅनरा बँक कर्मचारी सेना
  • अध्यक्ष-महाराष्ट्र दूध वितरक सेना.
  • अध्यक्ष-विमा कर्मचारी सेना.

हे ही वाचा - 

Sudhir Joshi passed away : शिवसेनेचे जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचं निधन, 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Embed widget