एक्स्प्लोर

Coronavirus | 'मुंबई रिटर्न' नऊ जणांना कोरोनाची लागण, रत्नागिरीवासियांच्या चिंतेत भर

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 15 वर पोहोचली आहे. त्यापैकी नऊ कोरोनाबाधित हे मुंबई रिटर्न आहेत.

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आता ऑरेंज झोनमध्ये असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याची चिंता मागील चार दिवसांमध्ये वाढली आहे. कारण, मागील चार दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात नऊ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, नव्याने सापडलेले हे कोरोनाचे रुग्ण हे 'मुंबई रिटर्न' आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 15 वर पोहोचली आहे. यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला रुग्ण हा गुहागर तालुक्यात आढळून आला होता. दुबईहून आलेल्या या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मरकज कनेक्शन असलेल्या राजीवडा या भागातील देखील एकाला कोरोनाची लागण झाली होती. यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात एकूण सहा जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये सहा महिन्यांच्या बाळाचा देखील समावेश होता. तर, खेडमधील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला कोरोना झाल्याचे रिपोर्टमधून समोर आले होते. पण, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये पाच रुग्णांना उपचाराअंती सोडून देण्यात आले होते. पण, आता नऊ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

'मुंबई रिटर्न' कोरोना रुग्ण आहेत कुठले? मागील चार दिवसामध्ये जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यांमध्ये कोरोनाचे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. या साऱ्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री ही 'मुंबई रिटर्न' आहे. मुंबईहून आलेल्या या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याने आता चाकरमान्यांना गावी घेण्यावरुन पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Lockdown | प्रेयसीच्या ओढीने मुंबई ते सिंधुदुर्ग पायी प्रवास, परत येताना पोलिसांनी दोघांनाही पकडलं!

चाकरमान्यांना गावी घेण्याची राजकारण्यांची मागणी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबई आणि पुणे या ठिकाणी सध्या कोकणातील लाखो नागरिक वास्तव्य करत आहेत. त्यामुळे सारी परिस्थिती पाहता त्यांना आपल्या कोकणातील मूळगावी आणावी अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून केली जात आहे. पण, त्यांना गावी आणल्यानंतर त्यांची आरोग्याच्या दृष्टीने कशी काळजी घेतली जाणार आहे? चाकरमान्यांना गावी घेण्याकरता विरोध नसून त्यांची शिवाय गावातील लोकांच्या आरोग्याची कशी काळजी घेणार? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

जिल्हा प्रशासनाचे आवाहन दरम्यान, मागील चार दिवसात नऊ कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. पण, नागरिकांनी घाबरु नये. मुंबई किंवा इतर ठिकाणाहून जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला क्वॉरन्टाईन करुन ठेवले जात आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी आतापर्यंत केले तसेच सहकार्य घाबरुन न जाता करावे असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
Nashik Municipal Corporation: नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Embed widget