(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiv Sena : शिवसेना आमदाराला 5 लाखांची खंडणी मागणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Shiv sena: शिवसेना आमदार सुनिल प्रभू यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतयाला बिडमधून अटक करण्यात आली आहे.
Shiv sena MLA Sunil Prabhu : शिवसेना आमदार सुनिल प्रभू यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतयाला बिडमधून अटक करण्यात आली आहे. निशांत उर्फ सनी परमार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुजरातमधील सांजान पोलिस ठाण्याचा अधिकारी बोलत असल्याचे सांगत निशांतने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगून एका आरोपीला शस्त्र घेण्यासाठी सुनील प्रभूंनी मदत केल्याचं सांगत खंडणी मागण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुनिल प्रभू यांच्या तक्रारीनंतर कुरार पोलिसांनी चौकशी केली आता हा तोतया असल्याचे स्पष्ट झालं. त्यानुसार 36 वर्षीय आरोपीला शोधून अटक करण्यात आली आहे.
खंडणीसाठी फोन आल्यानंतर आमदार सुनिल प्रभू यांनी कुरार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. सुनिल प्रभू यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास अधिक वेगानं सुरु केला. निशांत उर्फ सनी परमार याला बीडमधून राहत्या घरातून अटक केली. पोलिसांनी निशांत उर्फ सनी परमार याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. परमार याच्यावर आधीच 35 गुन्याची नोंद आहे. परमारने याने पोलिस अधिकारी बणून नेता आणि उद्योगपतींकडून वसूली करण्याचा प्रयत्न केल्याचं तपासात उघड झालेय.
काय आहे प्रकरण?
28 ऑक्टोबर रोजी कुरार पोलीस ठाण्यात एक फोन आला होता. त्यामधील व्यक्ती गुजरात सीमेवरील संजान पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचं सागितलं. त्या व्यक्तीनं आपण पोलीस अधिकारी असून आपलं नाव रमेशसिंग चौहान असल्याचे सांगितलं. आम्ही एका आरोपीला पिस्तूलसह अटक केली आहे, हे शस्त्र घेण्यासाठी आमदार सुनील प्रभू यांनी मदत केल्याचे तो सांगत आहे. तसेच त्याने एक हत्या केली असून तीदेखील प्रभू यांच्या सांगण्यावरून केली आहे. ही माहिती देतानाच त्यानं प्रभू यांचा मोबाइल क्रमांक आणि पत्ता विचारला.कुरार पोलिसांनी त्यांना मोबाइल क्रमांक आणि घरचा पत्ता मिळवून देतो असे सांगितले. काही वेळाने पुन्हा या अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्याने प्रभू यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी सहकार्य न केल्यास कारवाई करावी लागेल, असे तो सांगू लागला. प्रभू यांनीदेखील कुरार पोलिसांना फोन करून हा सर्व प्रकार सांगितला. प्रभू यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केल्यास तो तोतया असल्याचं समोर आलं.