(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Local : लोकल प्रवासावर निर्बंध? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले...
Mumbai Local Update : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वेगानं वाढत असली तरी लोकल बंद करण्याचा कोणताही विचार नाही, असं स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे.
Mumbai Local Update : दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यामुळं मुंबईची चिंता वाढली आहे. अशातच पुढील आठवडा मुंबईसाठी महत्त्वाचा असून मुंबईत तिसरी लाट (Mumbai Lockdown) धडकल्याचं बोललं जात आहे. अशातच मुंबईत लॉकडाऊन लागणार का? तसेच निर्बंध कठोर होणार का? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावामुळे मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या मुंबई लोकलवर निर्बंध लावले जाणार का? अशी भितीही मुंबईकरांना वाटत आहे. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावात मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वेगानं वाढत असली तरी लोकल बंद करण्याचा कोणताही विचार नाही, असं स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे.
आज मुंबईतील व्हाय. बी. सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची बैठक पार पडली. त्याबैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर सध्या तरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाहीत, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान राजेश टोपे यांनीदेखील याला दुजोरा दिला असून मुंबईची लोकल सध्या बंद करण्याचा कोणताही विचार सरकारसमोर नाही, असं आरोग्यमंत्र्यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे.
कोरोनानं मुंबईची काळजी वाढवली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोना रुग्णांचा उद्रेक होत असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत दिवसभरात 20 हजारांच्या घरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तर लॉकडाऊन लावावा लागेल, असे संकेत आयुक्त इक्बाल चहल यांनी दिले आहेत. काल (बुधवारी) मुंबईत दिवसभरात तब्बल 15 हजार 166 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का? असा प्रश्न आता सर्वांना सतावू लागला आहे.
पाहा व्हिडीओ : मुंबई लोकल बंद करणार नाही : राजेश टोपे
तिसरी लाट धडकली? मुंबईकरांनो पुढील आठवडा जिकरीचा
पुढील आठवडा मुंबईसाठी अधिक काळजीचा आहे. मुंबईत पुढील तीन ते चार दिवसांत कठोर निर्बंध लावण्याबाबर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. मुंबईत तिसरी लाट धडकली असून रोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळे रोज वाढणारी रुग्ण संख्या मुंबईसाठी चिंतेची बाब ठरत आहे. पुढील चार दिवसांत वाढ होणाऱ्या रुग्ण संख्येवर लक्ष असून त्यानंतर कठोर निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे ज्या वेगानं कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, ती पाहून सरकार आणि प्रशासनाची झोप उडालीय. राज्यात काल दिवसभरात 26 हजार 538 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत देशात तब्बल तब्बल 71 हजार 397 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 325 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत 1 डिसेंबर रोजी कोरोना बाधित 108 रुग्ण आढळले होते. 5 डिसेंबरला 213, 11 डिसेंबरला 256, 21 डिसेंबरला 327, 25 डिसेंबरला 757, 29 डिसेंबरला 2510, तर 1 जानेवारीला 8063 रुग्ण तर 4 जानेवारीला दहा हजारांचा टप्पा ओलांडून 10 हजार 860 इतक्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल दिवसभराती हिच रुग्णसंख्या उच्चांक गाठत 15166 वर पोहोचली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra Coronavirus Lockdown : राज्यात लॉकडाऊन लागणार? आरोग्यमंत्र्यांनी सांगितला ठाकरे सरकारचा निर्णय
- Lockdown : भारतात तिसऱ्या लाटेचं तांडव? जानेवारी महिन्यात पीक पॉईंट ; शास्त्रज्ञांचा अंदाज
- परवानगीशिवाय खासगी रुग्णालयांत कोरोनाबाधितांना भरती करण्यास मनाई, BMC चा मोठा निर्णय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह