एक्स्प्लोर
फळविक्रेता मारहाण, शेतकऱ्याच्या आरोपाने नवा ट्विस्ट
मुंबई : मनसे कार्यकर्त्यांनी घाटकोपरमध्ये उत्तर भारतीय फळविक्रेत्याला मारहाण केल्यानंतर, आता शेतकऱ्याची बाजूही समोर आली आहे.
ज्या शेतकऱ्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी फळविक्रेत्याला मारहाण केली, त्या शेतकऱ्याने फळविक्रेत्यावर गंभीर आरोप केले आहेत.
"मी तीनशे किलोमीटर लांबून येतो. नाशिक जिल्ह्यातून मुंबईत भाजीपाला घेऊन येतो. माझ्यासोबत म्हातारी आई, बायका-मुलं असतात. इथे भाजीपाल्याची गाडी घेऊन आल्यानंतर, तो फळविक्रेता नेहमी अरेरावी करत होता. इथे अजिबात गाडी लावायची नाही. इथून दुसरीकडे कुठेही जा, पण इथे गाडी लावायची नाही, अशी दमदाटी करत होता. माल विकू देत नव्हता. मी लांबून येत असल्यामुळे इथे येऊन त्याला काहीच बोलू शकत नव्हतो", असं हा शेतकरी म्हणाला.
याशिवाय पोलिसांकडे जाऊन तक्रार करण्यापूर्वी समजुतीने हे प्रकरण मिटावं, याला लांबड लागू नये, अशी मला आशा होती. त्यामुळे मी स्थानिक मनसे कार्यकर्त्यांकडे गेलो, अशीही प्रामाणिक कबुली या शेतकऱ्याने दिली.
याच फळविक्रेत्याने यापूर्वी अनेकदा दमदाटी केली होती. मात्र मी त्याला नेहमी सांगत होतो, तुझा फळांचा गाडा आहे, मी भाजीपाला विकतो, दोघांचे व्यवसाय वेगळे आहेत, मा तो कधीच ऐकत नव्हता, असा दावाही नाशिकच्या शेतकऱ्याने केला आहे.
फळविक्रेत्याला मारहाण
घाटकोपरमध्ये एका उत्तर भारतीय फळ विक्रेत्याला मनसेच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. अमृतनगरमध्ये बुधवारी संध्याकाळी 4 ते 5 च्या दरम्यान हा प्रकार घडला. मारहाणीनंतर त्याच्या हातगाडीवरची फळंही रस्त्यावर फेकून दिली. मराठी शेतकऱ्याला हा फळविक्रेता दमदाटी करत असल्याच्या कारणावरुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
संबंधित बातमी
मनसेची दादागिरी, उत्तर भारतीय फळविक्रेत्याला मारहाण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement