एक्स्प्लोर

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करताय? पण 'ही' अट तुम्ही करताय का पूर्ण?

Mukhyamantri Ladka Bhau Yojana: लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर लाडक्या भावांसाठी काय? असा सवाल विरोधकांनी विचारला होता. त्यालाच उत्तर म्हणून आता सरकारनं लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे.

Mukhyamantri Ladka Bhau Yojana: महाराष्ट्रातील (Maharashtra News) नारीशक्तीच्या पंखाला बळ देण्यासाठी राज्य सरकारनं (State Govt) लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा केली. येत्या रक्षाबंधनाला या लाभाचा पहिला टप्पा बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. त्याचसोबत राज्य सरकारनं आता लाडक्या भावांसाठीही (Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024) मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुका (Assembly Elections) लक्षात घेऊन मतांच्या पिकासाठी सरकारकडून योजनांची पेरणी सुरू झाली आहे. 

लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) जाहीर केल्यानंतर लाडक्या भावांसाठी काय? असा सवाल विरोधकांनी विचारला होता. त्यालाच उत्तर म्हणून आता सरकारनं लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. लाडक्या भावाकडेही आमचं लक्ष आहे, म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातून या योजनेचा फराळ महाराष्ट्राला दिला. त्याचप्रमाणे, लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनांची घोषणा करण्यासोबतच, मातंग समाजासाठीही बार्टीच्या धरतीवर आर्टी अर्थात अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. 

योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची अट काय? 

उमेदवाराचं वय 18 ते 35 वर्ष असणं आवश्यक

कोणाला किती रुपये मिळणार? 

  • बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6 हजार रुपये स्टायपेंड
  • डिप्लोमा झालेल्या तरूणाला दरमहा 8 हजार रुपये स्टायपेंड
  • पदवीधर तरूणाला दरमहा 10 हजार रुपये स्टायपेंड

योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी-शर्थी काय? 

  • तरूणांना कारखान्यात वर्षभर अप्रेंटीसशिप करावी लागणार
  • अप्रेंटीसशिपमधून कार्यानुभव,स्कील्ड मॅनपॉवरसाठी सरकारची गुंतवणूक
  • ज्या कारखान्यात काम करेल,तिथे स्टायपेंडचे पैसे सरकार भरणार

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढं काय? 

युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनीकडून त्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. संबंधित आस्थापना अथवा कंपनीला युवकाचं काम योग्य वाटल्यास त्यांना तिथं नोकरी देऊ शकतात. याशिवाय राज्य सरकार देत असलेल्या विद्या वेतनाशिवाय अधिकची रक्कम संंबंधित आस्थापना युवकांना देऊ शकतात. युवकांना राज्य सरकारकडून देण्यात येणारा स्टायपेंड दरमहा दिला जाणार आहे. हा स्टायपेंड सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मिळेल. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा लाभ संबंधित युवक फक्त एकदाच घेऊ शकतो. 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्त यांच्याकडून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी व्यवस्था येत्या काही दिवसात तयार केली जाईल. त्यानुसार बारावी, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या युवकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP MajhaSthanik Swarajya Sanstha :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर Ravindra Chavan प्रदेशाध्यक्ष?Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 12 Jan 2025 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 6.30 AM | 12 Jan 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Embed widget