एक्स्प्लोर

ST Bus Advertising: एसटीवर अनधिकृत जाहिराती लावल्यास खबरदार! दंडासह गुन्हाही दाखल होणार

आतापर्यंत एसटी बसमध्ये अनधिकृत जाहीराती किंवा पॅम्पलेट, स्टीकर्स चिपकवलेले असल्यास कर्मचारी ते काढून टाकत होते. मात्र आता या संदर्भात त्या अनधिकृत जाहीरातदाराची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात येणार आहे.

Nagpur News : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसवर अनेकांकडून अनधिकृत स्टिकर्स लावून जाहिरातबाजी करण्यात येते. त्यामुळे बसचे विद्रुपीकरणही होते. अशा जाहिरातबाजांवर एसटीच्यावतीने कठोर कारवाई करुन दंड वसूल करण्यात येणार असून आता पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने आता अनधिकृत जाहिरातदारांविरोधात कंबर कसली आहे.

राज्यातील प्रत्येक गावापर्यंत एसटीचे जाळे आहे. त्यामुळे लाखो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एसटी प्रभावी माध्यम ठरते. यासाठी काहीजणांकडून एसटीवर बसमधील आसन व्यवस्था, खिडकीवरील भाग, एसटी बसच्या बाहेरील बाजू आदी ठिकाणी स्टीकर्स आणि पॅम्पलेट चिटकवण्यात येतात. त्यामुळे एसटी बसचे विद्रूपीकरण होते. यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय एसटी महामडंळाने घेतला आहे.

खासगी एजन्सीची नियुक्ती

तोट्यात असलेल्या एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी महामंडळाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना व सवलती दिल्या जातात. मात्र एसटीच्या नेटवर्कचा फायदा घेत अनेकांकडून मोफतची जाहिरातबाजी करण्यात येते. या जाहिराती स्टिकर्स आणि पॅम्पलेट कर्मचारी काढून टाकत असतात. मात्र कुठलीही ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने अशा फुटक्यांचे फावते. मात्र आता एसटीचे उत्पन्नवाढीसाठी एसटी मंहामंडळातर्फे जाहीरातीसाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. 

आतापर्यंत एसटी बसमध्ये अनधिकृत जाहिराती किंवा पॅम्पलेट, स्टिकर्स चिपकवलेले असल्यास कर्मचारी ते काढून टाकत होते. मात्र आता या संदर्भात अनधिकृत जाहिरातदाराची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात येणार आहे. यासोबतच दंडही वसूल करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या नागपूर विभाग प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

मनपाला केव्हा येईल जाग?

एकीकडे नागपूर शहराची स्मार्टसिटीच्या दिशेने वाटचाल होते आहे. तर दुसरीकडे चौकाचौकात अनधिकृत पोस्टर्स, स्टीकर्स लावणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. फक्त भिंतीच नव्हे तर स्मार्टसिटीचे जंक्शन बॉक्स आदींवर या जाहीरातींचे पॅम्पलेट लावण्यात येतात. यावर अनेकवेळा हायकोर्टाने ताशेरे ओढल्यावरही आतापर्यंत ठोस कारवाई मनपाच्यावतीने (Nagpur Municipal Corporation) करण्यात आलेली नाही. त्यामुळे एकदा स्टिकर्स काढले की परत स्टीकर्स लावण्यात येतात. तरी यावर मनपानेही शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.

महत्त्वाची बातमी

Maharashtra Pune News : 'महिला वकिलांनी कोर्टात केस नीट करु नयेत'; पुणे जिल्हा कोर्टाच्या अजब आदेशानं वाद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 21 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Marathi Sahitya Sammelan : RSS मुळे माझा मराठीशी संबंध,पवारांसमोर UNCUT भाषणSharad Pawar Speech Marathi Sahitya Sammelan Delhi : आखिल भारतीय साहित्य संमेलनात शरद पवारांचे भाषणDr.Tara Bhawalkar speech Delhi:कोण पुरोगामी, कोण फुरोगामी, मोदी-पवारांसमोर तारा भवाळकरांनी सुनावलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Embed widget