एक्स्प्लोर

MPSC चा अंतिम निकाल जाहीर, सांगलीचा प्रमोद चौगुले पहिला तर बीडची सोनाली मात्रेची मुलींमध्ये बाजी

MPSC Success Story : राज्य सेवा 2021 सालची अंतिम निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये सांगलीच्या प्रमोद चौगुले याने बाजी मारली आहे. 

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) गेल्या वर्षी 7 ते 9 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2021 चा अंतिम निकाल दिनांक आज जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये प्रमोद बाळासाहेब चौगुले याने सर्वसाधारण उमेदवारांमधून राज्यात पहिला क्रमांत पटकावला आहे. तर सोनाली अर्जुनराव म्हात्रे हिने मुलींमधून पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच विशाल महादेव यादव हा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आला आहे. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण 405 पदांकरीता उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

निकालाच्या आधारे शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपुस्तिका, उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनां दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाणे कळविले आहे.

या वर्षी 28 फेब्रुवारी रोजी या परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली होती आणि त्यानंतर आता याच मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. 

प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांना राज्यात पहिला 

राज्यसेवा 2021 सालचा अंतिम निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला आला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूरच्या शुभम पाटीलने बाजी मारली आहे. मुलींमध्ये बीडच्या सोनाली म्हात्रे हिने पहिला क्रमांक पटकवला असून एकूणात ती राज्यात तिसरी आली आहे. प्रमोद चौगुले हा सध्या उद्योग आणि उपसंचालक या पदावर नाशिक येथे कार्यरत आहे. गेल्या वर्षीही तो राज्यात पाहिला आला होता. 

राज्यात पहिला आलेल्या प्रमोदचे वडील टेम्पो चालक आहेत तर आईने शिवणकाम करून संसाराचा गाडा चालवला. 2020 मध्ये प्रमोद चौगुले याने एमपीएससीमध्ये पहिला येण्याचा बहुमान मिळाला होता आणि त्यानंतर त्याची उद्योग विभागात उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली होती. 

कोल्हापूरचा शुभम पाटील दुसरा 

राज्यात दुसरा आलेला शुभम पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील साजनी या गावचा. शुभमचे वडील गणपती पाटील हे प्राथमिक शिक्षक तर आई गृहिणी. लहानपणापासून सरकारी अधिकारी व्हायचं हे शुभमचं ध्येय, आणि त्याला त्याच्या आई-वडिलांनी साथ दिली. 

शुभमने 2020 सालची राज्यसेवा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो राज्यात 22 वा आला. अतिशय काटेकोरपणे अभ्यासाचे नियोजन केल्यामुळे शुभमला हे यश मिळालं. त्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या शुभमने यंदाच्या एमपीएससीमध्ये राज्यात दुसरा येण्याचा मान मिळवला.

बीडची सोनाली मात्रे मुलींमध्ये राज्यात पहिली

बीड जिल्ह्यातील माजलगावच्या सोनाली अर्जुन मात्रे हिने एमपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. सोनालीने सर्वसाधारण यादीत तिसरी तर राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. सोनालीच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोनाली मात्रेचे वडील शेतकरी असून एका शेतकरी कन्येने हे यश मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

ही बातमी वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
ED Raid on I-PAC: पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
Embed widget