एक्स्प्लोर

MPSC Exam 2021 : लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांना विशेष प्रवासाची परवानगी द्या, कॉंग्रेसची मागणी 

राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार आता 14 मार्च रोजी होणारी परीक्षा 21 मार्च रोजी होणार आहे.21 मार्चच्या परीक्षेला लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यातील परीक्षार्थींना विशेष प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

मुंबई : एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर काल राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. त्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार आता 14 मार्च रोजी होणारी परीक्षा 21 मार्च रोजी होणार आहे. तर 21 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. या निर्णयानंतर काँग्रेसनं निर्णयाचं स्वागत केलं आहे. 

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी 21 मार्चला MPSC परीक्षा घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सर्वप्रकारच्या सरकारी भरतींच्या बाबतीत एक सुनियोजित धोरण व पारदर्शक प्रक्रिया जाहीर करुन संभ्रमावस्था दूर करावी. 21 मार्चच्या परीक्षेला लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यातील परीक्षार्थींना विशेष प्रवासाची परवानगी देण्यात यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

MPSC Exam Date 2021 | एमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर 

आयोगाकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर
राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार आता 14 मार्च रोजी होणारी परीक्षा 21 मार्च रोजी होणार आहे. नवीन परिपत्रकानुसार 21 मार्चनंतर होणाऱ्या बाकीच्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला होणार आहे. तर 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. 

काल नेमकं काय घडलं
राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून म्हटलं होतं. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली होती. आता पुन्हा परीक्षा पुढं ढकलल्याने  पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले होते. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले. यानंतर बराच गोंधळ उडाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज तारीख जाहीर करु असं सांगितलं होतं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget